विद्याविहार रेल्वे हद्दीत चोरी व लूटमारीच्या घटनांमध्ये वाढ, सुरक्षा व्यवस्था वाढवा- सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:06 AM2021-09-24T04:06:30+5:302021-09-24T04:06:30+5:30

मुंबई : विद्याविहार पूर्व भागातील राजावाडी परिसरापासून रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर चोरी व लूटमारीच्या घटना वाढत आहेत. रेल्वे ...

Increase in incidents of theft and looting at Vidyavihar railway boundary, increase security - Demand of social workers | विद्याविहार रेल्वे हद्दीत चोरी व लूटमारीच्या घटनांमध्ये वाढ, सुरक्षा व्यवस्था वाढवा- सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

विद्याविहार रेल्वे हद्दीत चोरी व लूटमारीच्या घटनांमध्ये वाढ, सुरक्षा व्यवस्था वाढवा- सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

Next

मुंबई : विद्याविहार पूर्व भागातील राजावाडी परिसरापासून रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर चोरी व लूटमारीच्या घटना वाढत आहेत. रेल्वे स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या परिसरात असणारा अंधार व सुरक्षेची अपुरी व्यवस्था यामुळे चोर, गर्दुल्ले येथून जाणाऱ्या एकट्या व्यक्तीवर हल्ला करत चोऱ्या करत आहेत. येथील सुरक्षा व्यवस्था वाढविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

मागील आठवड्यात राजावाडी रुग्णालयात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यास येथे लुटले होते. या घटनेनंतर महिला वर्ग प्रचंड भयभीत झाला आहे. या घटनेची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते प्रकाश वाणी, सचिन भांगे यांनी रेल्वे सुरक्षा अधिकारी, स्टेशन मास्तर, पोलीस यांना पत्र देत या चोर व गर्दुल्ल्यांचा सामान्य नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल वाढवून येथे बंदोबस्त तैनात करण्यात यावा अशी मागणी केली आहे. रेल्वेच्या हद्दीत दुतर्फा दिव्यांची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे.

Web Title: Increase in incidents of theft and looting at Vidyavihar railway boundary, increase security - Demand of social workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.