गर्दी वाढल्यास लोकलच्या फेऱ्यांत वाढ; मध्य, पश्चिम रेल्वेची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 11:32 AM2021-08-12T11:32:01+5:302021-08-12T11:32:11+5:30

मध्य रेल्वेच्या सध्या ९० टक्के फेऱ्या सुरू आहेत. फेऱ्या वाढविण्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही; पण प्रवासीसंख्या वाढल्यास रेल्वेच्या फेऱ्या वाढविण्यात येतील. त्यासाठी रेल्वे पूर्णपणे सज्ज आहे. 

Increase in local rounds as crowds increase; Central, Western Railway information | गर्दी वाढल्यास लोकलच्या फेऱ्यांत वाढ; मध्य, पश्चिम रेल्वेची माहिती

गर्दी वाढल्यास लोकलच्या फेऱ्यांत वाढ; मध्य, पश्चिम रेल्वेची माहिती

googlenewsNext

मुंबई : दोन डोस घेतलेल्यांना १५ ऑगस्टपासून लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र सध्या तरी रेल्वेच्या फेऱ्या वाढविण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही; पण गर्दी वाढल्यास गाड्या वाढविण्यात येतील, असे मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

मध्य रेल्वेच्या नियमित १७७४ फेऱ्या होतात, त्यांपैकी सध्या १६१२ फेऱ्या होत आहेत; तर पश्चिम रेल्वेच्या १३६७ फेऱ्या होतात, त्यांपैकी १३०० फेऱ्या सुरू आहेत. लोकल प्रवासाच्या परवानगीबाबत राज्य सरकारचा प्रस्ताव रेल्वेला १० ऑगस्ट रोजी मिळाला होता. बुधवारपासून पालिकेने कोरोना लसीकरण ऑफलाइन पडताळणी सुरू केली आहे.

मध्य रेल्वेच्या सध्या ९० टक्के फेऱ्या सुरू आहेत. फेऱ्या वाढविण्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही; पण प्रवासीसंख्या वाढल्यास रेल्वेच्या फेऱ्या वाढविण्यात येतील. त्यासाठी रेल्वे पूर्णपणे सज्ज आहे. 
- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
 
Web Title: Increase in local rounds as crowds increase; Central, Western Railway information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.