Join us

मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 4:10 AM

मुंबई : प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मध्य आणि पश्चिम रेल्वेने लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. सध्या ९० टक्के ...

मुंबई : प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मध्य आणि पश्चिम रेल्वेने लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. सध्या ९० टक्के फेऱ्या चालविण्यात येत होत्या, आता ९५ टक्के फेऱ्या चालविल्या जाणार आहेत.

रेल्वे प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व सोशल डिस्टन्सिंग हे सर्व मुद्दे लक्षात घेत, लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला होता.

सध्या मध्य रेल्वे मुंबई विभागाकडून १,६१२ फेऱ्या चालविण्यात येत आहेत. ७४ सेवांच्या वाढीसह, मध्य रेल्वेच्या सर्व उपनगरी विभागातील १,६८६ फेऱ्या या कोरोना (१,७७४ सेवांच्या) एकूण सेवांच्या ९५ टक्के होतील. सध्या पश्चिम रेल्वे मुंबई विभागाकडून १,२०१ फेऱ्या चालवत आहे. ९९ फेऱ्यांच्या वाढीसह, पश्चिम रेल्वेच्या सर्व उपनगरी विभागातील १,३०० उपनगरीय सेवा या कोरोनापूर्व(१,३६७ सेवांच्या) एकूण सेवांच्या ९५ टक्के होतील.