मुंबईत पुरुषांच्या आत्महत्यांमध्ये वाढ!; नऊ वर्षांत एकूण १० हजार ६५७ आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 04:56 AM2018-08-02T04:56:01+5:302018-08-02T04:56:22+5:30

मुंबईत २००८ ते २०१६ सालादरम्यान तब्बल १० हजार ६५७ मुंबईकरांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात पुरुषांची संख्या वर्षागणिक वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे.

 Increase in men's suicides in Mumbai; Total 10 thousand 657 suicides in nine years | मुंबईत पुरुषांच्या आत्महत्यांमध्ये वाढ!; नऊ वर्षांत एकूण १० हजार ६५७ आत्महत्या

मुंबईत पुरुषांच्या आत्महत्यांमध्ये वाढ!; नऊ वर्षांत एकूण १० हजार ६५७ आत्महत्या

Next

मुंबई : मुंबईत २००८ ते २०१६ सालादरम्यान तब्बल १० हजार ६५७ मुंबईकरांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात पुरुषांची संख्या वर्षागणिक वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. माहिती अधिकारात समोर आलेल्या माहितीमधील ९ वर्षांत आत्महत्या करणाऱ्यांत ६ हजार ५०७ पुरुष, तर ४ हजार १५० महिलांचा समावेश आहे.
आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई पोलिसांकडे जानेवारी २००८ सालापासून झालेल्या आत्महत्यांची आकडेवारी मागितली होती. त्याला उत्तर देताना गुन्हे शाखेचे शासकीय माहिती अधिकारी व सहायक पोलीस आयुक्त (प्रतिबंधक) जनार्दन थोरात यांनी ही माहिती दिली. महत्त्वाची बाब म्हणजे २००८ सालापासून २०१६ सालापर्यंत आत्महत्या करणाºया मुंबईकरांच्या संख्येत वाढच झाली आहे. त्यामुळे समुपदेशनाची गरज असल्याचे मत शेख यांनी व्यक्त केले आहे.
२००८ साली आत्महत्या केलेल्या मुंबईकरांत ६६७ पुरुष, तर ४४४ महिलांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. तर २०१६ साली आत्महत्यांच्या संख्येत १ हजार २०५ इतकी वाढ नोंदवण्यात आली आहे. मात्र यामध्ये आत्महत्या करणाºया पुरुषांची संख्या तब्बल ८०९ इतकी वाढली असून महिलांच्या संख्येत ३९६ इतकी घट झाल्याचे दिसते.
याबाबत शासनाने तत्काळ उपापयोजना करण्याची गरज शेख यांनी व्यक्त केली आहे.

मुंबईत झालेल्या आत्महत्यांची वर्षनिहाय आकडेवारी
वर्ष पुरुष महिला एकूण
२००८ ६६७ ४४४ १,१११
२००९ ६२१ ४३० १,०५१
२०१० ७०१ ४९१ ११९२
२०११ ६४० ५२२ १,१६२
२०१२ ७६२ ५३४ १,१९६
२०१३ ८३१ ४९१ १,३२२
२०१४ ७४७ ४४९ १,१९६
२०१५ ७२९ ३९३ १,१२२
२०१६ ८०९ ३९६ १,२०५

Web Title:  Increase in men's suicides in Mumbai; Total 10 thousand 657 suicides in nine years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.