लोकलमध्ये मोबाइल चोरीच्या घटनेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 02:13 AM2019-03-02T02:13:55+5:302019-03-02T02:13:58+5:30

२०१८ मध्ये ३२ हजार ४७६ मोबाइल चोरीला; २ हजार ५१७ गुन्ह्यांची झाली उकल

Increase in mobile theft incidents in local | लोकलमध्ये मोबाइल चोरीच्या घटनेत वाढ

लोकलमध्ये मोबाइल चोरीच्या घटनेत वाढ

Next

मुंबई : मुंबई उपनगरीय लोकलमधून प्रवास करताना गर्दीचा फायदा घेऊन मोबाइल चोरी करणाऱ्या चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. जानेवारी २०१३ पासून ते जानेवारी २०१९ पर्यंतच्या आकडेवारीनुसार लोकलमध्ये मोबाइल चोरीच्या घटनेत ३१ टक्के वाढ झाली आहे. या काळात एकूण ६२ हजार ५३१ मोबाइल चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत़ १०३ कोटी ८६ लाख ३८ हजार ९०२ रूपये किंमतीच्या मोबाइल चोरीच्या घटनेची नोंद झाली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना माहितीच्या अधिकाराखाली प्राप्त झालेल्या कागदपत्रांनुसार, २०१८ मध्ये ३२ हजार ४७६ मोबाईल चोरीला गेल्याची नोंद आहे. यात फक्त २ हजार ५१७ गुन्हांची उकल झाली आहे.


उपनगरी रेल्वेमधून १ जानेवारी २०१३ पासून ते डिसेंबर २०१८ पर्यंत एकूण ५९ हजार ९०४ मोबाइल चोरीच्या घटना घडल्या आहेत. यामधील फक्त ८ हजार ८६८ मोबाइल मिळाले असून १० कोटी ३८ हजार १५२ रूपये किंमतीच्या मोबाइल मिळाले आहेत. यामध्ये फक्त १० टक्के मोबाइल शोधण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.


चोरी केलेले मोबाइल देशातील इतर राज्यात आणि नेपाळ देशात विकले जात आहेत. हे मोबाइल शोधण्यासाठी रेल्वे पोलिसांच्यावतीने विशेष पथकांची फौज तयार केली आहे.


३१ टक्के वाढ : जानेवारी २०१३ पासून ते जानेवारी २०१९ पर्यंत चोरीची आकडेवारी
२०१३ मध्ये एकूण १ हजार ४५ मोबाइल चोरीच्या घटनेत १ कोटी ४६ लाख ६४ हजार ५७० रूपये किंमतीचे मोबाइल चोरी झाले. यातील फक्त ७० लाख ४९ हजार ४४७ रूपये किंमतीचे ७१० मोबाइल मिळाले आहेत. २०१४ मध्ये एकूण १ हजार ५१८ मोबाइल चोरीच्या घटनेत २ कोटी १७ लाख ९१ हजार ६३७ रूपये किंमतीचे मोबाइल चोरी झाले. यातील फक्त १ कोटी ९६ लाख ५५ हजार ५०९ रूपये किंमतीचे ८३३ मोबाइल मिळाले आहेत. २०१५ मध्ये एकूण २ हजार ९२ मोबाइल चोरीच्या घटनेत ३ कोटी ५४ लाख ३७ हजार ८६४ रूपये किंमतीचे मोबाइल चोरी झाले. यातील फक्त १ कोटी ५९ लाख ८४ हजार १ रूपये किंमतीचे १ हजार २०१ मोबाइल मिळाले आहेत. रूपये २०१६ मध्ये एकूण २ हजार ९ मोबाइल चोरीच्या घटनेत ३ कोटी ८२ लाख ७२ हजार ८१७ रूपये किंमतीचे मोबाइल चोरी झाले. यातील फक्त १ कोटी ८१ लाख ३१ हजार ४४७ रूपये किंमतीचे १ हजार २४३ मोबाइल मिळाले आहेत. २०१७ मध्ये एकूण २ हजार ७६४ मोबाइल चोरीच्या घटनेत ३३ कोटी ९६ लाख १ हजार ५८५ रूपये किंमतीचे मोबाइल चोरी झाले. यातील फक्त ३ कोटी ३२ लाख ३६ हजार ४५ रूपये किंमतीचे २ हजार ३३४ मोबाइल मिळाले आहेत. २०१८ मध्ये एकूण ३२ हजार ४७६ मोबाइल चोरीच्या घटनेत ५४ कोटी ४९ लाख २८ हजार ४०८ रूपये किंमतीचे मोबाइल चोरी झाले. यातील फक्त ३ कोटी ९९ लाख ४५ हजार ६१४ रूपये किंमतीचे २ हजार ५१७ मोबाइल मिळाले आहेत.

Web Title: Increase in mobile theft incidents in local

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.