अंधेरी, वांद्रे, माटुंगा, मुलुंडमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 05:59 AM2021-03-09T05:59:01+5:302021-03-09T05:59:27+5:30

संसर्गाचा धाेका; रुग्ण वाढीचे दैनंदिन प्रमाण ०.४३ ते ०.३२ टक्क्यांवर

Increase in the number of corona victims in Andheri, Bandra, Matunga, Mulund | अंधेरी, वांद्रे, माटुंगा, मुलुंडमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ

अंधेरी, वांद्रे, माटुंगा, मुलुंडमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचा संसर्ग संपूर्ण मुंबईत पुन्हा वाढत आहे. त्यामुळे रुग्णवाढीचा दैनंदिन सरासरी दर ०. ३० टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र अंधेरी पश्चिम, वांद्रे पश्चिम, सायन-माटुंगा आणि मुलुंड येथे  रुग्ण वाढीचे दैनंदिन प्रमाण ०.४३ ते ०.३२ टक्के आहे. येथे  बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 
गेल्या महिन्यापासून मुंबईतील काेराेनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ हाेत आहे. रोज एक हजारांहून अधिक बाधितांची नोंद होत आहे. 

सुरुवातीला चेंबूर आणि मुलुंडमध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक होता. मात्र गेल्या दोन आठवड्यांत येथील सर्वच विभागांमध्ये रुग्ण कमी-अधिक प्रमाणात वाढत आहेत. लोकसंख्या अधिक असलेल्या अंधेरी पश्चिममध्ये काेराेनाच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक वाढ हाेत आहे. त्यया  पाठोपाठ वांद्रे पश्चिम विभाग,   मुलुंड, चेंबूर, सायन, माटुंगा येथेही रुग्ण वाढत आहेत.  

धारावीत १८ कोरोना बाधित
गेले अनेक महिने कोरोना संसर्ग थोपवून ठेवणाऱ्या धारावीत आता ताे वाढू लागला आहे. सोमवारी १८ बाधित आढळले. यापूर्वी २३ ऑक्टोबर २०२० रोजी १८ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर रोज दोन - चार रुग्ण आढळून येत होते. सध्या सक्रिय रुग्णांचा आकडा ८६ आहे.

सर्वाधिक सील 
इमारती अंधेरी पश्चिमेत  
पाचपेक्षा अधिक बाधित रुग्ण असलेल्या १९० सील इमारतींपैकी अंधेरी पश्चिमेत सर्वाधिक ३० इमारती तर दोनपेक्षा अधिक रुग्ण असलेले ४९३ मजले प्रतिबंधित आहेत. त्यापाठोपाठ कांदिवली विभागातही ३० इमारती सील असून २८८ मजले प्रतिबंधित आहेत. 
 

सर्वाधिक वाढ विभाग    दैनंदिन 
    रुग्ण वाढ
के पश्चिम, अंधेरी प.    ०४२
एच पश्चिम, वांद्रे प    ०.४१
एफ उत्तर, सायन, माटुंगा    ०.४१
टी, मुलुंड    ०.४०
एम पश्चिम, चेंबूर    ०.३६
एम पूर्व..गोवंडी, मानखुर्द    ०.३६
एन, घाटकोपर    ०.३२

गेल्या आठवड्याभरात अंधेरी भागात ६४२ रुग्ण वाढले आहेत. तर मुलुंड मध्ये ४८४, माटुंगा - ३६१, वांद्रे - ३४३ आणि चेंबूरमध्ये २५६ रुग्ण वाढले आहेत.

Web Title: Increase in the number of corona victims in Andheri, Bandra, Matunga, Mulund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.