Join us

श्रीगणेश उत्सव विशेष गाड्यांच्या डब्यांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2021 4:10 AM

मुंबई : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पुढील श्रीगणेश उत्सव विशेष ट्रेनमध्ये प्रत्येकी दोन शयनयान डब्बे ...

मुंबई : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पुढील श्रीगणेश उत्सव विशेष ट्रेनमध्ये प्रत्येकी दोन शयनयान डब्बे वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस - सावंतवाडी रोड विशेष, पुणे - मडगाव विशेष , पनवेल - सावंतवाडी रोड विशेष, पनवेल - करमाळी विशेष गाड्या आता २४ डब्यांसह चालविण्यात येणार आहे.

--

खासगीकरणाला रेल्वे कर्मचाऱ्यांचा विरोध

मुंबई : केंद्र सरकारच्या मोनेटायझेशन (वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉइज युनियन परेल महालक्ष्मी शाखेतर्फे एचआरएमचा कामगारांना त्रास, केंद्र सरकारच्या मोनेटायझेशन (खासगीकरण) विरोधात, ‘राष्ट्रवादी चेतावनी दिवसा’चे आयोजन ८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत वेस्टर्न रेल्वे कारखाना, लोअर परेल येथे करण्यात येणार असून, या सभेला कॉम्रेड जे.आर. भोसले (जनरल सेक्रेटरी वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉइज युनियन) उपस्थित राहणार आहेत.

----

महापालिका अधिकाऱ्यांना खड्डे सफर

मुंबई : गणपती बाप्पाचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले असताना आणि वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा महापालिकेचे रस्ते विभागाचे अधिकारी सुस्त आहेत, म्हणून नगरसेविका प्रीती सातम यांनी अधिकारीवर्गाला सोबत घेऊन स्वतः गाडी चालवत खड्ड्यांमुळे होणारा त्रास काय आहे, त्याचा अनुभव घेण्याची विनंती केली. पुढील दोन दिवसात सर्व खड्डे भरून रस्ते पूर्ववत केले जातील, असे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी दिली. जर रस्ते पूर्ववत नाही झाले तर मग याच खड्ड्यात आंदोलन करू, असा इशारा अधिकाऱ्यांना दिला.