अन्नपदार्थांच्या ऑनलाइन ऑर्डरमध्ये वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 04:30 AM2020-04-29T04:30:31+5:302020-04-29T04:30:48+5:30

खाद्यपदार्थाच्या ऑनलाईन ऑर्डर घेणाऱ्या दोन कंपन्यांचा व्यवसाय कमी झाला होता.

Increase in online ordering of food items | अन्नपदार्थांच्या ऑनलाइन ऑर्डरमध्ये वाढ

अन्नपदार्थांच्या ऑनलाइन ऑर्डरमध्ये वाढ

Next

मुंबई : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात दोन आठवडे अनेक जणांनी बाहेर अन्नपदार्थ खाणे टाळले होते. तसेच खाद्यपदार्थाच्या ऑनलाईन ऑर्डर घेणाऱ्या दोन कंपन्यांचा व्यवसाय कमी झाला होता. परंतु, लॉकडाऊननंतर महिनाभरात या दोन्ही अ‍ॅपमार्फत अन्नपदार्थांच्या आॅर्डरमध्ये वाढ झाली आहे. एका सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. एका खासगी संस्थेने १५ मार्च ते १६ एप्रिलदरम्यान ग्राहकांचे सर्वेक्षण केले होते. मार्चच्या सुरुवातीला एका कंपनीचे ग्राहक ४६.३ वरून ४१.७ टक्के, तर दुसºया कंपनीचे ग्राहक ४८.८ वर ४२.४ टक्क्यांपर्यंत घटले होते. कोरोना विषाणूचा दुष्प्रभाव टाळण्यासाठी दोन्ही कंपन्यांनी ‘नो कॉन्टॅक्ट डिलिव्हरी’ सेवा सुरू केली आहे. किराणा माल आणि अत्यावश्यक वस्तूची डिलिव्हरी करताना कर्मचाऱ्यांना आवश्यक वस्तू पुरविण्यात येत आहेत. याचा परिणाम म्हणून आता लॉकडाऊनच्या काळात अ‍ॅपद्वारे सेवा देणाºया दोन्ही कंपन्यांमार्फत मागणी वाढली आहे.

Web Title: Increase in online ordering of food items

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.