मराठी भाषेसह हिंदीचाही सन्मान वाढवा - हंसराज अहिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 04:44 AM2018-01-19T04:44:53+5:302018-01-19T04:46:18+5:30
मराठी भाषेबरोबर हिंदी भाषेचाही सन्मान होत आहे, ही आनंदाची बाब आहे. भारतामध्ये साहित्यिकांनी हिंदीचा सन्मान वाढविला पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले.
मुंबई : मराठी भाषेबरोबर हिंदी भाषेचाही सन्मान होत आहे, ही आनंदाची बाब आहे. भारतामध्ये साहित्यिकांनी हिंदीचा सन्मान वाढविला पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले.
महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे २०१६-१७चा पुरस्कार सोहळा बुधवारी रंगशारदा नाट्यमंदिर येथे पार पडला. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, हिंदी साहित्य अकादमी कार्याध्यक्ष नंदलाल पाठक, आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
राज्यस्तरीय सन्मान जीवन गौरव पुरस्कारांतर्गत ‘छत्रपती शिवाजी राष्ट्रीय एकता पुरस्कार’ डॉ. माधव सक्सेना (अरविंद), ‘साने गुरुजी राष्ट्रीय एकता पुरस्कार’ हृदयेश मयंक, ‘पद्मश्री अनंत गोपाल शेवडे हिंदी सेवा पुरस्कार’ पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री, ‘डॉ. उषा मेहता हिंदी सेवा पुरस्कार’ अश्विनीकुमार मिश्र, ‘गजानन माधव मुक्तिबोध मराठी भाषी हिंदी लेखक पुरस्कार’ डॉ. अशोक कामत, ‘कांतिलाल जोशी इतर हिंदी भाषी हिंदी लेखक पुरस्कार’ गंगाधर ढोबळे, ‘व्ही. शांताराम ललित कला हिंदी विशिष्ट सेवा पुरस्कार’ राम गोविंद यांना तसेच ‘सुब्रह्मण्यम भारती हिंदी सेतु विशिष्ट सेवा पुरस्कार’ डॉ. इंद्रबहादूर सिंह यांना देण्यात आला.
काव्यप्रकारासाठीचा ‘संत नामदेव पुरस्कार’ डॉ. भगवान गव्हाडे, नेहा विलास भांडारकर तसेच माधवी दीपक चौरसिया, नाटक या विभागासाठी ‘विष्णुदास भावे पुरस्कार’ स्वामी बुद्धदेव भारती, उपन्यास यासाठी देण्यात येणारा ‘जैनेंद्र कुमार पुरस्कार’ रश्मी वर्मा, रेखा शिवकुमार बैजल तसेच पवन चिंतामणी तिवारी यांना, कहानीसाठी देण्यात येणारा ‘मुंशी प्रेमचंद’ पुरस्कार भारती गोरे, अरविंद श्रीधर झाडे तसेच डॉ. दीप्ती गुप्ता, व्यंग तसेच ललित निबंधासाठीचा ‘आचार्य रामचंद्र शुक्ल पुरस्कार’ संतोष रामनारायण पांडेय, महेश दुबे तसेच ‘राजेश कुमार रा. मिश्र (राजेश विक्रांत), जीवनी-आत्मकथा यासाठी देण्यात येणारा ‘काका कालेलकर पुरस्कार’ डॉ. राजेंद्र पटोरिया, लोकसाहित्याठीचा ‘फणीश्वरनाथ रेणु’ पुरस्कार रमेश यादव आणि डॉ. विनायक सांबा तुमराम, बालसाहित्य यासाठी देण्यात येणारा ‘सोहनलाल द्विवेदी पुरस्कार’ डॉ प्रमिला शर्मा, शंकर विठोबाजी विटणकर आणि विवेक मुंदडा, समीक्षा यासाठी देण्यात येणारा ‘आचार्य नंददुलारे वाजपेयी पुरस्कार’ डॉ. सतीश पांडेय, डॉ. दयानंद रामचंद्र तिवारी आणि प्रा. डॉ. रणजीत रामराव जाधव, पत्रकारिता-सिनेपत्रकारितेसाठीचा ‘बाबूराव विष्णु पराडकर’ पुरस्कार विवेक अग्रवाल, अनुवाद यासाठी देण्यात येणारा ‘मामा वरेरकर पुरस्कार’ सुनंदा श्रीराम देवस्थळी, अशोककुमार जौहरीलाल बिंदल, डॉ. चंद्रशेखर शर्मा यांना तसेच वैज्ञानिक तंत्रज्ञानासाठीचा ‘होमी जहांगीर भाभा पुरस्कार’ डॉ. कृष्ण कुमार मिश्र यांना देण्यात आला.