Join us

देशातून समुद्रमार्गे होणाऱ्या मालवाहतुकीच्या क्षमतेत वाढ: अमिताभ कुमार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 4:56 AM

नौकावहन क्षेत्रासह जहाजांवर काम करणाºया कामगारांची संख्या वाढली

- खलील गिरकर मुंबई : देशाच्या नौकावहन क्षेत्रात सातत्याने वाढ होत असून गेल्या पाच वर्षांत भारताच्या मालवाहू जहाजांच्या संख्येत सुमारे २०० ने वाढ झाली आहे. डिसेंबर २०१८ च्या १,४०३ जहाजांच्या तुलनेत ३१ ऑक्टोबरपर्यंत २० जहाजे वाढून जहाजांची संख्या १,४२३ झाली. त्यामुळे समुद्रमार्गाच्या मालवाहतूक क्षमतेत मोठी वाढ झाली. नौकावहन क्षेत्रातील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असून या क्षेत्रात महिलांचे प्रमाण वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असल्याची माहिती नौकावहन महासंचालक अमिताभ कुमार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

या क्षेत्रात कामासाठी जाणारे भारतीय मोठ्या प्रमाणात विदेशी जहाजांवर कार्यरत आहेत. मात्र गेल्या ३ वर्षांपासून भारतीय जहाजांवरील कार्यरत कर्मचाºयांची संख्या वाढत आहे. २०१५ मध्ये १ लाख २६ हजार ९५० कर्मचारी कार्यरत होते. २०१६ मध्ये ही संख्या १ लाख ४३ हजार ९४० झाली. २०१७ मध्ये १ लाख ५४ हजार ३४९ जणांनी तर, २०१८ मध्ये २ लाख ८ हजार ७९९ जणांनी या क्षेत्रात काम करण्यास प्राधान्य दिले. २०१९ च्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत २ लाख ३१ हजार ७७६ भारतीय जहाजांवर कामाला रुजू झाले. २०१८ च्या तुलनेत २२, ९७७ जणांची वाढ झाली आहे. २०१८ च्या २ लाख ८ हजार ७९९ कर्मचाºयांमध्ये भारतीय जहाजांवर काम करणाºयांची संख्या २७ हजार ३६४ होती तर विदेशी जहाजांमध्ये काम करणाºयांची संख्या १ लाख ८१ हजार ४३५ होती.

भारतीय जहाजांद्वारे होणारी मालवाहतूक ३१ आॅक्टोबर २०१९ पर्यंत १ कोटी २७ लाख १८ हजार ४७४ ग्रॉस टन झाली. गतवर्षी डिसेंबरमध्ये हे प्रमाण १ कोटी २६ लाख ८८ हजार ३३३ ग्रॉस टन होते. यंदा दहा महिन्यांत त्यामध्ये ३० हजार १४१ ग्रॉस टन वाढ झाल्याची माहिती नौकावहन विभागाचे साहाय्यक महासंचालक संदीप अवस्थी यांनी दिली. नौकावहन मंत्री मनसुख मांडवीय यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली मालवाहतुकीचे प्रमाण वाढविण्यासाठी राबवण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे ही वाढ झाल्याची माहिती अवस्थी यांनी दिली.

जहाजांवर कार्यरत असलेल्या कर्मचाºयांना आवश्यक सी फेअरर्स आयडेन्टिफिकेशन डॉक्युमेंटसह विविध प्रमाणपत्रांची नोंदणी बायोमेट्रिक व आॅनलाइन केली जात असून त्यामुळे उमेदवारांना तत्काळ प्रमाणपत्र मिळते, महासंचालनालयाला त्यांची अद्ययावत माहिती उपलब्ध होते, अशी माहिती नौकावहन विभागाचे उप महासंचालक सुभाष बरगुजर यांनी दिली. भारतातून विदेशी जहाजांवर जाणाºया उमेदवारांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळावे यासाठी प्रशासनाने लक्ष केंद्रित केल्याची माहिती त्यांनी दिली.

महिला कर्मचाºयांचे प्रमाण वाढवण्यावर भर

भारतीय जहाजांची संख्या व त्याद्वारे होणारी मालवाहतूक वाढीस लागल्याने जहाजांवर काम करणाºयांच्या संख्येतदेखील वाढ होऊ लागली आहे. महिला कर्मचाºयांचे प्रमाण वाढवण्यावर भर देण्यात येत असून त्यासाठी महिलांना शिष्यवृत्ती देण्यासारख्या योजना हाती घेण्यात आल्याची माहिती अमिताभ कुमार यांनी दिली.

टॅग्स :सागरी महामार्गमुंबई