सहा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना बढती
By admin | Published: January 6, 2017 04:27 AM2017-01-06T04:27:15+5:302017-01-06T04:27:15+5:30
भारतीय पोलीस सेवेतील चार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना विशेष पोलीस महासंचालक तर दोघांना अपर पोलीस संचालक म्हणून पदोन्नती मिळाली आहे.
मुंबई : भारतीय पोलीस सेवेतील चार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना विशेष पोलीस महासंचालक तर दोघांना अपर पोलीस संचालक म्हणून पदोन्नती मिळाली आहे. तीन अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना करण्यात आली आहे.
रितेश कुमार (विशेष पोलीस महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे) यांना अपर पोलीस महासंचालक व संचालक, बिनतारी संदेश-मुंबई तर अमिताभ गुप्ता (नियंत्रक, वैध मापन शास्त्र, मुंबई) यांची नियंत्रक म्हणूनच अपर पोलीस महासंचालक दर्जाच्या पदावर श्रेणीवाढ करून बढती देण्यात आली आहे. दीपक पांडे (पोलीस उप-महानिरीक्षक, राज्य सुरक्षा महामंडळ) यांना विशेष पोलीस महानिरीक्षक व सह व्यवस्थापकीय संचालक, पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ,
मुंबई (सध्या रिक्त असलेले
अपर पोलीस महासंचालक दर्जाचे
पद तात्पुरत्या स्वरूपात विशेष
पोलीस महानिरीक्षक दर्जामध्ये
श्रेणी अवनत करून) बढती देण्यात आली आहे.
विजयसिंग मल्हारराव जाधव (पोलीस उप-महानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, मुंबई) यांची विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशिक्षण व खास पथके-रिक्त पद), प्रतापसिंग संपतराव पाटणकर (अपर पोलीस आयुक्त, नागपूर) यांची विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर येथे बढतीने बदली झाली आहे. तर शरद रामचंद्र शेलार (अपर पोलीस आयुक्त, पूर्व विभाग ठाणे) यांना विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बढती देण्यात आली आहे.
त्यांच्या बदलीचे आदेश नंतर जारी होतील.
संतोष रस्तोगी (सह पोलीस आयुक्त, नागपूर) यांची राज्य गुप्तवार्ता विभागात सह-आयुक्त, सुनील रामानंद (सह-पोलीस आयुक्त, पुणे) यांची विशेष पोलीस महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग - पुणे तर रवींद्र कदम (विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर) यांची सहपोलीस आयुक्त - पुणे शहर येथे बदलीने पदस्थापना करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)