अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या कर्जासाठीच्या मुदतीत वाढ; ३१ डिसेंबर डेडलाईन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 08:51 PM2018-12-19T20:51:37+5:302018-12-19T20:55:23+5:30

अल्पसंख्याक विकास विभागाच्या अखत्यारित असलेल्या मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने अल्पसंख्याक घटकातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक व तांत्रिक आणि एमबीए, एमबीबीएस, बीई आदी उच्च अभ्यासक्रमासाठी कर्ज दिले जाते. २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी त्याबाबतची प्रक्रिया ५ सप्टेंबरपासून आॅनलाईन सुरु करण्यात आली होती.

Increase in the term for minority students' loans; 31st deadline | अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या कर्जासाठीच्या मुदतीत वाढ; ३१ डिसेंबर डेडलाईन

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या कर्जासाठीच्या मुदतीत वाढ; ३१ डिसेंबर डेडलाईन

Next
ठळक मुद्दे संबंधितांना त्यासाठी आता ३१ डिसेंबरपर्यत अर्ज करता येणार आहेतना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष हैदर आजम यांच्या अध्यक्षतेखाली अल्पसंख्याक विभागाची बैठक घेण्यात आली त्यामुळे इच्छुकांना संबंधित प्रक्रियेसाठी विलंब लागत असल्याने ३१ डिसेंबरपर्यत मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

मुंबई - राज्य सरकारकडून अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक व उच्च अभ्यासक्रमासाठी देण्यात येणाऱ्या शैक्षणिक कर्जासाठी करावयाच्या अर्जासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे. संबंधितांना त्यासाठी आता ३१ डिसेंबरपर्यत अर्ज करता येणार आहेत.
अल्पसंख्याक विकास विभागाच्या अखत्यारित असलेल्या मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने अल्पसंख्याक घटकातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक व तांत्रिक आणि एमबीए, एमबीबीएस, बीई आदी उच्च अभ्यासक्रमासाठी कर्ज दिले जाते. २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी त्याबाबतची प्रक्रिया ५ सप्टेंबरपासून आॅनलाईन सुरु करण्यात आली होती. मात्र विहित नमुन्यात अर्ज करण्यात विद्यार्थ्यांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत असल्याने त्याची मुदत ३१ डिसेंबर २०१८ पर्यत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष हैदर आजम यांच्या अध्यक्षतेखाली अल्पसंख्याक विभागाची बैठक घेण्यात आली. जिल्हा कार्यायल व महामंडळाच्या संकेतस्थळावर त्याबाबत सविस्तर माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे इच्छुकांना संबंधित प्रक्रियेसाठी विलंब लागत असल्याने ३१ डिसेंबरपर्यत मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

Web Title: Increase in the term for minority students' loans; 31st deadline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.