Join us  

स्मार्ट अंगणवाड्यांची संख्या वाढविणार; भाडेतत्त्वावरील जागांसाठी दुपटीने भाडेवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2024 6:21 AM

शासनाच्या स्व-मालकीच्या जागेतील अंगणवाड्यांमधून दरवर्षी पाच हजार अंगणवाड्या स्मार्ट करण्याची योजना सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : शासनाच्या स्व-मालकीच्या जागेतील अंगणवाड्यांमधून दरवर्षी पाच हजार अंगणवाड्या स्मार्ट करण्याची योजना सुरू आहे. याअंतर्गत मागील तीन वर्षांत १६ हजार ८८५ अंगणवाडी केंद्रांचे स्मार्ट अंगणवाडी केंद्रांमध्ये रूपांतर झाले असून, याची गती वाढविण्यासाठी शासनाकडे परवानगी मागितली जाणार आहे. भाडेतत्त्वावरील अंगणवाड्यांसाठीच्या भाड्यामध्ये दुपटीने वाढ केली असून, अधिकची वाढ करण्याबाबत सकारात्मक पावले उचलली जातील, अशी माहिती महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी विधानपरिषदेत दिली.

राज्यातील अंगणवाड्यांसंदर्भात आमदार भाई गिरकर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह सत्यजित तांबे, ज्ञानेश्वर म्हात्रे, गोपीचंद पडळकर, जयंत पाटील, सुनील शिंदे आदींनी राज्यातील अंगणवाड्यांचा मुद्दा शासनाच्या निदर्शनास आणून दिला. मंत्री आदिती तटकरे यावर स्पष्टीकरण दिले. महापालिका क्षेत्रातील भाडेतत्त्वावरील अंगणवाडी केंद्रांच्या भाड्याच्या रकमेत चार हजारवरून आठ हजार, अ वर्ग नगरपालिका क्षेत्रात

८,०८४ नवीन अंगणवाडी केंद्रांचे प्रस्ताव

राज्यात १ लाख १० हजार ५५६ अंगणवाडी केंद्र आहेत. यापैकी ७२,३७९ केंद्र स्वमालकीच्या जागेत आहेत. ज्या केंद्रांना स्वमालकीची जागा नाही तेथे जागा उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे. जेथे अंगणवाडी केंद्र नाहीत अशा ८,०८४ नवीन अंगणवाडी केंद्रांचे प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात आले आहेत. ज्या अंगणवाडी केंद्रांना वीज उपलब्ध होत नाही अथवा वीज खंडित होते त्याठिकाणी सोलरच्या माध्यमातून ही अडचण दूर करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तीनवरून सहा हजार, तर ग्रामीण भागातही भाड्याच्या रकमेत दुपटीने वाढ करण्यात आली असल्याचे मंत्री तटकरे यांनी सांगितले. 

टॅग्स :विधानसभाअदिती तटकरे