आरक्षण मर्यादा वाढवा, तिढा आपोआप सुटेल, शरद पवार यांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 11:08 AM2023-09-11T11:08:02+5:302023-09-11T11:09:36+5:30
Mumbai: मराठा आरक्षणातून मार्ग काढायचा असेल तर आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यात १६ टक्के आणखी वाढवून आरक्षण ५० अधिक १६ असे केले तर सगळे प्रश्न सुटतील, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी मांडली.
मुंबई - मराठा आरक्षणातून मार्ग काढायचा असेल तर आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यात १६ टक्के आणखी वाढवून आरक्षण ५० अधिक १६ असे केले तर सगळे प्रश्न सुटतील, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी मांडली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात आयोजित केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत ते बोलत होते.
ते म्हणाले की, तामिळनाडू सरकारने हे बंधन ७४ टक्क्यांपर्यंत नेले आणि ते न्यायालयात टिकले, अर्थात त्यावेळची परिस्थिती वेगळी होती; पण ते टिकले. न्यायालयाने काही विषयांबाबत सरकारविरोधात निकाल दिले; पण सरकारने कायदा बदलला. हे जर सरकार करू शकते, तर ५० टक्क्यांच्या पुढे १६ टक्के आरक्षण देऊन हा प्रश्न निकालात का काढत नाहीत, असा सवाल त्यांनी केला.
कुणाच्या ताटातील भाकरी आम्हाला नको. कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी न करता अथवा इतर जातीचा त्यामध्ये समावेश न करता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आरक्षणाची मर्यादा वाढवावी.
- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
कारवाईसाठी मुंबईतून फोन?
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मुंबईतून फोन गेले होते; पण केलेल्या कारवाईबद्दल पोलिस अधिकाऱ्यांना शिक्षा दिली.
यामागे जाणीवपूर्वक कारस्थान असल्याची अनेकांना शंका आहे, अशी टीका पवार यांनी सरकारवर केली.
पक्षाचे चिन्ह, नाव जाईल याची तयारी ठेवा
nसहा निवडणुकीला मी वेगवेगळी चिन्हे घेऊन निवडणूक लढलो आणि लोकांनी मला निवडून दिले. जुन्या मित्रांकडून सातत्याने सांगितले जाते की, चिन्ह आणि पक्षाचे नाव आम्हालाच मिळणार, त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात चलबिचल होते.
nनिवडणूक आयोग जो निर्णय देईल, तो अंतिम असेल. याबाबत चिंता करायचे कारण नाही, असेही पवार यावेळी म्हणाले.