Join us

जिल्ह्यात मतदान 75 टक्क्यांपर्यंत वाढवा

By admin | Published: September 20, 2014 10:57 PM

सर्व प्रयत्नांची परिणीती मतदानाची टक्केवारी 75 टक्केपर्यंत वाढविल्यास भारत निवडणूक आयोग देखिल समाधानी होतील असे प्रतिपादन केंद्रीय जनजागृती निरीक्षक आर.एन.मिश्र यांनी शनिवारी केले.

अलिबाग : रायगड जिल्ह्यात मतदार जनजागृतीचे कार्यक्र म उत्तम रितीने राबविल्याचे दिसत असून त्याबद्दल आपण समाधानी आहोत तसेच या सर्व प्रयत्नांची परिणीती मतदानाची टक्केवारी 75 टक्केपर्यंत वाढविल्यास भारत निवडणूक आयोग देखिल समाधानी होतील असे प्रतिपादन केंद्रीय जनजागृती निरीक्षक आर.एन.मिश्र यांनी शनिवारी केले.        
जिल्हाधिकारी कार्यालयात विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सर्व नोडल अधिकारी, तसेच विभाग प्रमुखांची बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते.या बैठकीला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सुमंत भांगे, पोलीस अधीक्षक डॉ.शशीकांत महावरकर, अप्पर जिल्हाधिकारी प्रविण शिंदे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) किरण पाणबुडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विश्वनाथ वेटकोळी, तसेच सर्व नोडल अधिकारी, निवडणूक यंत्नणोचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
मार्गदर्शन करतांना मिश्र म्हणाले की, भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठी आपण सर्व कटीबध्द असून मतदानासाठी जास्तीत जास्त सहभाग वाढावा यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहोत. नुकतीच लोकसभेची निवडणूक झाल्याने आपण या सर्व यंत्नणोबाबत ज्ञात आहात त्यामुळे याचाही फायदा या निवडणूकीत होईल. मात्न न थकता स्फुर्तीने काम करावे. तसेच मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी युवा पिढीच्या मतांचा फार मोठा सहभाग मिळू शकतो त्यासाठी ही युवा पिढी वापरत असलेल्या सोशल मिडीयाचाही वापर करु न जनजागृती करावी. आदिवासी भागातील माता-भिगनींसाठी त्यांनी मतदानात सहभागी व्हावे याकरीता अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स यांच्यामार्फत प्रयत्न झाल्यास त्याचाही फायदा होऊ शकेल. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सुमंत भांगे यांच्या नेतृत्वात उत्तम काम होत असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
प्रारंभी जिल्हाधिकार्यांनी त्यांचे स्वागत करु न निवडणूकीच्या पूर्व तयारी विषयी संगणकीय सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली. तसेच मतदार जनजागृती मोहिमेंतर्गत रायगड जिल्ह्यात करण्यात आलेल्या सर्व विधानसभा मतदार संघाच्या उपक्र मांची माहिती दिली.
आर.एन.मिश्र यांनी माध्यम कक्षाला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी सुमंत भांगे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी विश्वनाथ वेटकोळी, अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दिपक क्षीरसागर, तहसिलदार विनोद खिरोळकर, एम.सी.एम.समतिीचे सदस्य सचिव पी.डी.पाटोदकर तसेच माध्यम कक्षातील सुरेश पाटील, श्री.गायकवाड, विठ्ठल बेंदुगडे, हिरामण भोईर, आदि उपस्थित होते.