पाणीपट्टी वसुली अभय योजनेला वाढ

By admin | Published: August 22, 2014 12:38 AM2014-08-22T00:38:14+5:302014-08-22T00:38:14+5:30

विविध शासकीय कार्यालयांमध्ये थकलेली पाणीपट्टी व मलनिस्सारण आकार वसूल करण्यासाठी आणलेल्या अभय योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आह़े

Increase in water supply recovery scheme | पाणीपट्टी वसुली अभय योजनेला वाढ

पाणीपट्टी वसुली अभय योजनेला वाढ

Next
मुंबई : विविध शासकीय कार्यालयांमध्ये थकलेली पाणीपट्टी व मलनिस्सारण आकार वसूल करण्यासाठी आणलेल्या अभय योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आह़े संपूर्ण थकबाकी एकाच वेळी भरल्यास दोन टक्क्यांचा अतिरिक्त आकार माफ होत असल्याने या योजनेचा कालावधी वाढवून देण्याची मागणी सरकारी कार्यालयांकडून होत होती़ त्यानुसार पालिकेने आणखी दोन महिन्यांसाठी या योजनेचा कालावधी वाढवला आह़े
विविध शासकीय व खासगी कार्यालयांमध्ये होत असलेला पाणीपुरवठा व मलनिस्सारण आकाराचे एकूण 1128 कोटी रुपये थकले आहेत़  अनेक वेळा पाठपुरावा करूनही थकबाकी वसूल होत नसल्याने पालिकेने 16 जून 2क्14 रोजी अभय योजना आणली़ त्यानुसार केंद्र सरकार, राज्य सरकार, म्हाडा, एमएमआरडीए, मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे अशा शासकीय व खासगी कार्यालयांशी पालिकेने चर्चा सुरू केली़ नगरसेवक, प्रभाग समिती अध्यक्षांची मदत आणि बॅनर्सच्या माध्यमातूनही थकबाकीदारांकडे पोहोचण्याचा प्रयत्न पालिकेने केला़
या प्रयत्नांमुळे 11़84 टक्के रक्कम जमा झाली़  मात्र ही रक्कम कमी आह़े त्याच वेळी कोटय़वधींची थकबाकी एकरकमी देण्यास थोडा कालावधी लागत असल्याने ही मुदत वाढवण्याची मागणी शासकीय कार्यालयांनी पालिकेकडे केली आह़े त्यानुसार ही योजना 17 ऑगस्ट ते 17 ऑक्टोबर अशी दोन महिने राबविणार आह़े या योजनेला स्थायी समितीने नुकतीच मंजुरी दिली.(प्रतिनिधी)
 
कार्यालयवसूल अभय 
रक्कमयोजनेत वसुली
शासकीय36़7816़79
खासगी96़8127़32
एकूण133़5944़11

 

Web Title: Increase in water supply recovery scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.