Join us

आता हवामानाचा अंदाज वर्तविण्याच्या कार्यक्षमतेत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2020 8:44 AM

weather news: बंगालचा उपसागरासह अरबी समुद्रात फार चक्रिवादळे निर्माण होत नवहती. मात्र गेल्या काही वर्षांत  हे प्रमा्ण वाढले. पूरस्थितीचा विचार करतामान्सुनच्या सक्रियतेचे प्रमाण वाढल्याने पुराच्या घटनांतही वाढ झाली.

मुंबई - अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात २०१७ ते २०१९ या तीन वर्षांत मोठ्या संख्येने चक्रीवादळांची नोंद झाली. याच काळात हवामान अंदाजवर्तविण्याच्या कार्यक्षमतेतही वाढ झाल्याचा दावा पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने  केला.

बंगालचा उपसागरासह अरबी समुद्रात फार चक्रिवादळे निर्माण होत नवहती. मात्र गेल्या काही वर्षांत  हे प्रमा्ण वाढले. पूरस्थितीचा विचार करतामान्सुनच्या सक्रियतेचे प्रमाण वाढल्याने पुराच्या घटनांतही वाढ झाली. बहुतांश पर्जन्यमापन केंद्रावर गेल्या तीन वर्षात  मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली.  मे २०२० साली आलेल्या अम्फान चक्री वादळामुळे पश्चिम बंगाल, ओडिशा येथील १.९ कोटी नागरिक विस्थापित झाले. १.७ कोटी नागरिकांची घरे उद्धस्त  झाली.  मुरूडला धडकलेल्या  निसर्ग चक्रीवादळामुळेही न भरून येणारी हानी झाली. ओव्हरसिज डेव्हलपमेंटमुळेही न भरून येणारी  हानी झाली.

ओव्हरसिज डेव्हलपमेंट संस्थेच्या अंदाजानुसार, २०३० सालापर्यंत जगभरात ३२.५ कोटी नागरिकांवर जागतिक तापमानवाढीशी संबंधित आपत्तींचे संकट घोंगावणार असतानाच २००८ ते २०१९ या काळात भारतात दरवर्षी सरासरी ३६ लाख नागरिक विस्थापित झाले. याचे प्रमुख कारण मान्सुनमुळे आलेला पूर तर दुसरे चक्रिवादळ होय.

टॅग्स :हवामान