मुंबईत येण्यासाठी वाढवल्या ३०० एसटी फेऱ्या; डोंबिवलीतील उद्रेकानंतर निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 01:37 AM2020-09-12T01:37:53+5:302020-09-12T07:02:11+5:30
प्रवाशांना मिळणार दिलासा
मुंबई : नोकरदार प्रवाशांचा डोंबिवलीत उद्रेक झाल्यानंतर मुंबई महानगर क्षेत्रातून मुंबईत येणाºया प्रवाशांसाठी राज्य सरकारने ३०० एसटीच्या फेºया वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईत येण्यासाठी प्रवासात तीन ते चार तास वाया घालवावे लागणाºया या प्रवाशांना दिलासा मिळेल.
कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर लोकल सेवा बंद असून, केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी विशेष गाड्या धावत आहेत. त्यामुळे एसटीने प्रवास करणाºयांची संख्या जास्त आहे. मुंबई महानगर परिसरात एसटी महामंडळाकडून दररोज ९९५ फेºया चालवण्यात येतात. त्या पुरेशा नव्हत्या. तासन्तास रांगेत उभे राहूनही एसटी बस न मिळाल्याने गुरुवारी डोंबिवलीत संतप्त प्रवाशांनी मंत्रालयाला जाणारी बस रोखून धरली होती. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेनंतर परिवहनमंत्री अनिल परब यांनी कामासाठी मुंबईत येणाºया प्रवाशांच्या समस्यांबाबत एसटीच्या अधिकाºयांसोबत चर्चा केली. महानगर क्षेत्रातील किती कामगार एसटीने प्रवास करत आहेत, याची एसटीच्या अधिकाºयांना चौकशी करण्यास त्यांनी सांगितले. त्यातून आलेल्या माहितीनुसार महानगर क्षेत्रात एसटी बसच्या फेºयांची संख्या वाढविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
मागील काही दिवसांत एसटी प्रवासासाठी प्रवाशांसाठी लांब रांगा लागत आहेत. आम्ही त्याचा आढावा घेत आहोत. लोकांना दिलासा देण्यासाठी आम्ही शक्य तितक्या बसची संख्या वाढविणार आहोत, असे एसटीच्या अधिकाºयांनी सांगितले. दरम्यान, ३०० एसटीच्या फेºया वाढविण्यात येणार असल्याचे समजते.
दररोज २१,५०० एसटी प्रवाशी
च्मुंबई महानगर भागात एसटीच्या ६२ मार्गांवर ९९५ फेºया केल्या जात आहेत. दररोज सरासरी २१,५०० प्रवासी प्रवास करतात. त्यात पश्चिम विभागातील विरार, वसई, मीरा रोड, नालासोपारा आणि पालघरचा समावेश आहे. नवी मुंबई विभागातर्फे १६ मार्गांवरून पनवेल, वाशीमार्गे बसगाड्या चालवल्या जात आहेत, तर मध्यवर्ती विभागातून १६ मार्गांवरून गाड्या चालवल्या जातात. यात शहापूर, कल्याण ठाणे आणि बदलापूरचा समावेश आहे. एकूण २१,५०० प्रवाशांत सरासरी पश्चिम भागातील ७,७००, नवी मुंबईतील ३,२०० तर मध्यवर्ती विभागातील १९,४५० प्रवासी आहेत.