मुंबई-मडगाव विशेष गाड्यांचे डबे वाढवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:06 AM2021-07-18T04:06:04+5:302021-07-18T04:06:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोकण रेल्वेमार्गावरील प्रवाशांसाठी रेल्वेने खूशखर दिली आहे. मध्य रेल्वेने मुंबई-मडगांव विशेष गाड्यांमध्ये ...

Increased coaches of Mumbai-Madgaon special trains | मुंबई-मडगाव विशेष गाड्यांचे डबे वाढवले

मुंबई-मडगाव विशेष गाड्यांचे डबे वाढवले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोकण रेल्वेमार्गावरील प्रवाशांसाठी रेल्वेने खूशखर दिली आहे. मध्य रेल्वेने मुंबई-मडगांव विशेष गाड्यांमध्ये एक वातानुकूलित डबल डेकर आणि नऊ वातानुकूलित थ्री-टायर डबे वाढवले आहेत.

लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगांव द्विसाप्ताहिक विशेष गाडी ९ थ्री टायर आणि एक चेअर कार या वाढवलेल्या डब्यांसह आता एकूण २२ डब्यांची धावेल. लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगांव ६ ते १५ सप्टेंबर तर मडगांव-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष ७ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर धावणार आहे.

मडगांव-लोकमान्य टिळक टर्मिनस द्विसाप्ताहिक विशेष गाडीला ९ थ्री टायर आणि एक चेअर कार या वाढीव डब्यांसह एकूण २२ डबे असतील. लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगांव गाडी ४ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर धावेल. मडगांव-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी ५ सप्टेंबर ते १२ या कालावधीत धावणार आहे.

Web Title: Increased coaches of Mumbai-Madgaon special trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.