लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोकण रेल्वेमार्गावरील प्रवाशांसाठी रेल्वेने खूशखर दिली आहे. मध्य रेल्वेने मुंबई-मडगांव विशेष गाड्यांमध्ये एक वातानुकूलित डबल डेकर आणि नऊ वातानुकूलित थ्री-टायर डबे वाढवले आहेत.
लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगांव द्विसाप्ताहिक विशेष गाडी ९ थ्री टायर आणि एक चेअर कार या वाढवलेल्या डब्यांसह आता एकूण २२ डब्यांची धावेल. लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगांव ६ ते १५ सप्टेंबर तर मडगांव-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष ७ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर धावणार आहे.
मडगांव-लोकमान्य टिळक टर्मिनस द्विसाप्ताहिक विशेष गाडीला ९ थ्री टायर आणि एक चेअर कार या वाढीव डब्यांसह एकूण २२ डबे असतील. लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगांव गाडी ४ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर धावेल. मडगांव-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी ५ सप्टेंबर ते १२ या कालावधीत धावणार आहे.