वाढीव वीजबिल सवलतीचा चेंडूू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 03:33 AM2020-10-27T03:33:24+5:302020-10-27T07:29:51+5:30

electricity bill concession News : वाढीव वीजबिलाबाबत अनेकांनी तक्रारी केलेल्या होत्या. त्यानंतर हे वीजबिल कमी करण्यासंदर्भातील ऊर्जा विभागाचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेला आला होता.

Increased electricity bill concession ball in CM's court | वाढीव वीजबिल सवलतीचा चेंडूू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

वाढीव वीजबिल सवलतीचा चेंडूू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

Next

मुंबई - लॉकडाउनच्या काळात आलेल्या वाढीव वीजबिलात सवलत देण्यासंबंधीचा प्रस्ताव आपल्या विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला आहे. आता ते योग्य निर्णय घेतील, अशी माहिती ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.

वाढीव वीजबिलाबाबत अनेकांनी तक्रारी केलेल्या होत्या. त्यानंतर हे वीजबिल कमी करण्यासंदर्भातील ऊर्जा विभागाचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेला आला होता. प्राप्त माहितीनुसार त्यावेळी  वित्त विभागाने वीजबिल कमी करण्यासंदर्भात असमर्थता व्यक्त केली होती. कारण, राज्य शासनावर त्याचा मोठा आर्थिक भार आला असता.

राज्याची सध्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता वित्त विभागाने त्या बाबत नकार दिला होता. त्यातच वाढीव वीजबिलात सवलत देण्यासाठी केंद्र सरकारने राज्याला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राज्याने करीत तसा प्रस्तावही केंद्राकडे पाठविला होता. 
मात्र, त्यास अद्याप प्रतिसाद मिळालेला नसल्याची माहिती आहे.

नव्या रिडिंगनुसार बिले
 कोरोना लॉकडाउन काळात महावितरणच्याकडून वीज मीटरचे रीडिंग न घेता सरासरी बिले पाठविण्यात येत होती. 
 लॉकडाउन उठविण्यात आल्यानंतर जूनमध्ये रिडिंग घेण्याचे काम सुरू झाले आणि नव्या रिडिंगनुसार एकत्रित बिले पाठविण्यात आली. 
 मात्र, ती अव्वाच्या सव्वा आकारली अशी तक्रार अनेक सेलिब्रिटी, विविध संघटनांनी केली होती.
 राज्याची सध्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता वित्त विभागाने त्या बाबत नकार दिला होता. 

Web Title: Increased electricity bill concession ball in CM's court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.