क्रायोजेनिक्स तंत्रज्ञानामुळे दुग्ध उत्पादनात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 05:17 AM2017-11-07T05:17:33+5:302017-11-07T05:17:38+5:30
देशात पहिल्यांदा नाशिक येथे क्रायोजेनिक्स तंत्रज्ञानाद्वारे राबविण्यात आलेल्या उपक्रमातून दुग्ध उत्पादनांत वाढ झाल्याचा दावा संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांनी केला आहे.
मुंबई : देशात पहिल्यांदा नाशिक येथे क्रायोजेनिक्स तंत्रज्ञानाद्वारे राबविण्यात आलेल्या उपक्रमातून दुग्ध उत्पादनांत वाढ झाल्याचा दावा संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांनी केला आहे. नुकतेच नाशिक येथे इंडियन आॅइल कॉर्पोरेशन लिमिटेड, क्रायोजेनिक्स ग्रुप यांच्या वतीने ‘क्रायोजेनिक्स - की फॉर सक्सेस आर्टिफिशियल इन्सिमेशन’ या संकल्पनेवर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते. मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीचे प्रोफेसर डॉ. मिलिंद अत्रे यांच्यासह लाइव्हस्टॉक डेव्हलपमेंट बोर्डाचे देशभरातील मुख्य कार्यकारी अधिकारी, दूध संघटना, स्वयंसेवी संस्था, पशुवैद्यकीय क्षेत्रात काम करणाºया व्यक्ती या वेळी उपस्थित होत्या. इंडियन आॅइलचे मुख्य महाव्यवस्थापक श्रीकृष्ण चेरवू या वेळी म्हणाले, क्रायोजेनिक्स तंत्रज्ञानाशी संबंधित आवश्यक उच्च दर्जाची उत्पादने आम्ही देशभरात पुरवीत आहोत. बीएआयएफ फाउंडेशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. ए.बी. पांडे म्हणाले, पशुवैद्यकीय संस्थांनी त्यांच्या अत्याधुनिक टिकाऊ उपकरणांच्या वापरासह सर्वोत्कृष्ट परिणामांसाठी इंडियन आॅइलची सेवा वापरायला हवी. दरम्यान, इंडियन आॅइलने नाशिकमध्ये मेसर्स ग्लोबल गुडने दान केलेल्या तंत्रज्ञानासह गेल्या वर्षी ‘एक्स्ट्रा कोल्ड कनिस्टेर्स’ निर्माण करण्यास सुरुवात केली. यामुळे देशातील दूध उत्पादनात वाढ झाली आहे. मेलिंडा आणि बिल गेट्स फाउंडेशन या संस्थेद्वारे निधी मिळालेल्या ग्लोबल गुडचे संचालक डॉ. मेरी कॉनेट यांनी येथील कामाबाबत समाधान व्यक्त केले. तेलंगणा, झारखंड, पटना, केरळ, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांतील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी वर्गाने परिषदेला हजेरी लावली होती.