मुंबई : अकरावी प्रवेश यंदा दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या निकालवरच होणार असल्याने अकरावी प्रवेशासाठीची नामांकित महाविद्यालयातील स्पर्धा अधिक चुरशीची होणार आहे.मुंबई विभागात राज्य मंडळाच्या १५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत तर ३६ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. यात आयसीएसई मंडळाचा राज्याचा दहावीचा निकालही १०० टक्के आणि सीबीएसई मंडळाचा पुणे विभागाचा निकालही ९० टक्क्यांवर लागल्याने या स्पर्धेला धार येणार आहे. अकरावी प्रवेशाच्या पहिल्या २ ते ३ गुणवत्ता याद्यांचा कट ऑफ ९० टक्क्यांच्या खाली येणे अवघड असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करून दहावीच्या निकालावरच अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे नियोजन करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी दिली. मात्र यंदाची दहावीच्या निकालाच्या उच्चांकाची आकडेवारी पाहता राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसमोर इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांचे नामांकित महाविद्यालयातील प्रवेशासाठीचे मोठे आव्हान आहे. ४५ ते ६० टक्क्यांदरम्यान राज्य मंडळाचे तब्बल ७९ हजार ५८७ विद्यार्थी आहेत. नामांकित महाविद्यालयाचे प्रवेश नव्वदीपारच पूर्ण होतील. मात्र इतर ठिकाणीही प्रवेश मिळविताना या विद्यार्थ्यांना शेवटच्या फेरीपर्यंत वाट पाहावी लागण्याची शक्यता काही प्राचार्य व्यक्त करीत आहेत.राज्य मंडळाची टक्केवारीनिहाय विद्यार्थीसंख्या९० % आणि त्याहून अधिक १५,५४०८५ % ते ९० % २१,९९२८०% ते ८५ % ३२,२९४७५ % ते ८० % ४१,९९२७० % ते ७५% ४९,९६५६५ % ते ७० % ५५,०५३६० % ते ६५ % ५९,२६४४५ % ते ६० % ७९,५८७४५ % टक्क्याहून कमी १८,८३२आयसीएसई दहावी निकालाची आकडेवारीआयसीएसई - १००%एकूण प्रविष्ठ विद्यार्थी संख्या- २४,३५९मुले १३३१४ ५४.६६%मुली ११,०४५ ४५. ३४%सीबीएसई पुणे विभाग निकाल - ९९. ९२%मागील वर्षी राज्यात अकरावीच्या सुमारे ३२ टक्के जागा रिक्त राहिल्या होत्या. त्यामुळे यंदाही अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अडचण येणार नाही.- वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्रीमुंबईतील अकरावीच्या मागील वर्षीच्या जागाशाखा एकूण केंद्रीय फेरीत कोट्यामधील एकूण प्रवेश प्रवेश क्षमता निश्चित प्रवेश प्रवेशकला ३७३०० १७८५३ ४२६१ २२११४वाणिज्य १७३८८० ९९६७९ ३०६१९ १३०२९८विज्ञान १०३९१० ५३६२३ १४५४४ ६८१६७एचएसव्हीसी ५६६० २७२६ ३४६ ३०७२एकूण ३२०७५० १७३८८१ ४९७७० २२३६५१
वाढलेल्या टक्केवारीने यंदा प्रवेशासाठी चुरस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 7:24 AM