रेल्वे प्रवाशांच्या प्रतिसादात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:08 AM2021-09-04T04:08:47+5:302021-09-04T04:08:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : लसीचे दोन डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्यांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी मिळाल्यानंतर अपेक्षेप्रमाणे ...

Increased response from train passengers | रेल्वे प्रवाशांच्या प्रतिसादात वाढ

रेल्वे प्रवाशांच्या प्रतिसादात वाढ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : लसीचे दोन डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्यांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी मिळाल्यानंतर अपेक्षेप्रमाणे प्रवाशांत वाढ झाली आहे. ११ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या काळात साडेपाच लाखांहून अधिक मासिक पासची विक्री झाली आहे.

पाससाठी मध्य व पश्चिम रेल्वे उपनगरीय स्थानकांतील तिकीट खिडक्यांसमोर रांगा लागत आहेत. सध्या मध्य आणि पश्चिम रेल्वेने ९५ टक्के फेऱ्या सुरू केल्या आहेत. ११ ऑगस्ट ते २ सप्टेंबरपर्यंत मध्य रेल्वेवर ४ लाख ३ हजार ४२३ पासची विक्री झाली. पश्चिम रेल्वेवर एकूण १ लाख ४८ हजार २५५ पासची विक्री झाली आहे. दोन्ही मिळून एकूण ५ लाख ५१ हजार ६७८ पासची विक्री झाली आहे.

Web Title: Increased response from train passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.