Join us

मतदानाचा वाढलेला टक्का भाजपच्या पथ्यावर?

By रेश्मा शिवडेकर | Published: May 22, 2024 4:14 PM

पहिल्या दोन टप्प्यांत कमी मतदान झाल्यानंतर भाजपने मतदान टक्का वाढविण्याच्या दृष्टीने व्यूहरचना आखण्यावर भर दिला.

 

मुंबई : मुंबईतील इतर लोकसभा मतदारसंघांच्या तुलनेत उत्तर मुंबईत सर्वाधिक म्हणजे ५७ टक्क्यांपर्यंत झालेले मतदान भाजपच्या पीयूष गोयल यांना बळ देऊन जाणार असल्याची चर्चा आहे. देशभर मतदानाचा वाढलेला टक्का भाजपच्या पथ्यावर पडतो, असे आजवरच्या निवडणुकीत दिसून आले आहे. 

पहिल्या दोन टप्प्यांत कमी मतदान झाल्यानंतर भाजपने मतदान टक्का वाढविण्याच्या दृष्टीने व्यूहरचना आखण्यावर भर दिला. भाजपचे हे प्रयत्न आणि त्यात विधानसभेवर लक्ष ठेवत शिंदेसेनेने मराठी पट्ट्यात लावलेली आपली ताकद यामुळे उत्तर मुंबईचा मतदानाचा टक्का मुंबईत सर्वाधिक राखण्यात भाजप-महायुतीच्या प्रयत्नांना यश आल्याचे दिसून येते. सहा विधानसभांपैकी बोरिवलीत भाजपला सर्वाधिक मतदान होत आले आहे. यंदाही बोरिवलीत सर्वाधिक ६२.६१ टक्के मतदान झाले आहे. त्याचा फायदा भाजपला होईल, असा अंदाज आहे.

विधानसभानिहाय मतदान मतदारसंघ       २०२४ दहिसर    १,५९,०३७बोरिवली    १,९९,६५५मागठाणे    १,६२,८५१कांदिवली(पू.)    १,५२,१६२चारकोप    १,७७,५०३मालाड(प.)    १,८०,५३७एकूण    १०,३१,७४५

दहिसर, चारकोपमध्ये मतदान झालेले दिसून येते. हे दोन्ही भाग मराठीबहुल समजले जातात. या ठिकाणी शिंदेसेनेने जोरदार ताकद लावल्याचे यंदा दिसून आले होते. त्यामुळे इथले मतदानही भाजपला हात देऊन जाण्याची शक्यता आहे.भाजपसमोरचे आव्हानगेल्यावर्षी उत्तर मुंबईत ६० टक्क्यांच्या आसपास मतदान झाले होते. तेव्हा मिळालेले ४.६५ लाखांचे मताधिक्य यंदा केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनाही मिळावे, हे भाजपसमोरचे आव्हान होते. 

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४मतदान