म्युच्युअल फंड एसआयपीला ग्राहकांची वाढती पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 01:13 PM2022-01-12T13:13:05+5:302022-01-12T13:15:03+5:30

२०२१मध्ये म्युच्युअल फंड्समध्ये ७ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकची गुंतवणूक करण्यात आली आहे.

Increasing consumer preference for mutual fund SIPs | म्युच्युअल फंड एसआयपीला ग्राहकांची वाढती पसंती

म्युच्युअल फंड एसआयपीला ग्राहकांची वाढती पसंती

googlenewsNext

मुंबई : कोरोना संकटात गुंतवणूकदारांनी आपला विश्वास म्युच्युअल फंडवर ठेवला आहे. एकट्या डिसेंबर महिन्यात  म्युच्युअल फंड्समध्ये २५,०७६.७१ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. ही म्युच्युअल फंड्स उद्योगाच्या इतिहासातील एका महिन्यातील सर्वात मोठी गुंतवणूक ठरली. २०२१मध्ये म्युच्युअल फंड्समध्ये ७ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकची गुंतवणूक करण्यात आली आहे.

म्युच्युअल फंड्स इन इंडिया (एएमएफआय)च्या अहवालानुसार,  इक्विटी फंड्सशिवाय ईटीएफमध्ये १८,७०२ कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक करण्यात आली आहे. डिसेंबरमध्ये १२.५४ लाख नवीन एसआयपी खाती उघडण्यात आली आहेत. या खात्यांची संख्या ४.९१ कोटी रुपये झाली आहे. म्युच्युअल फंडांचा एयूएम डिसेंबरमध्ये ३७.७२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

सलग नवव्या महिन्यामध्ये म्युच्युअल फंडांमधील गुंतवणुकीमध्ये वाढ झाली आहे. इक्विटी फंडांमधील मल्टीकॅप फंडांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. त्यामुळे मालमत्तेमध्ये १६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
- अखिल चतुर्वेदी, चीफ बिझनेस ऑफिसर, मोतीलाल ओसवाल 

Web Title: Increasing consumer preference for mutual fund SIPs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fundsनिधी