सीएच्या कबुलीमुळे शाहरुखच्या अडचणीत वाढ,आयकर विभागाकडे नोंदवला जबाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 01:15 AM2018-02-04T01:15:14+5:302018-02-04T01:15:40+5:30
कोट्यवधीच्या फार्म हाऊस जप्ती प्रकरणामध्ये बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खानच्या अडचणीत वाढ झालेली आहे. त्याच्या सुचनेवरुनच फार्महाऊसबाबत बनावट कागदपत्रे बनविण्यात आली होती, असा जबाब शाहरुखचे पूर्र्वाश्रमीचे लेखा परीक्षक(सीए) व विश्वासू मोरेश्वर आजगावकर यांनी आयकर विभागाकडे दिला आहे.
मुंबई : कोट्यवधीच्या फार्म हाऊस जप्ती प्रकरणामध्ये बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खानच्या अडचणीत वाढ झालेली आहे. त्याच्या सुचनेवरुनच फार्महाऊसबाबत बनावट कागदपत्रे बनविण्यात आली होती, असा जबाब शाहरुखचे पूर्र्वाश्रमीचे लेखा परीक्षक(सीए) व विश्वासू मोरेश्वर आजगावकर यांनी आयकर विभागाकडे दिला आहे. त्यामुळे फार्म हाऊस जप्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाºयांकडून सांगण्यात आले.
अलिबाग येथील समुद्रकिनाºयाशेजारील १९ हजार ९६० चौरस मीटर जागेतील फ्लॅट बेनामी मालमत्तेअतर्गंत जप्त केला आहे. शेतजमीन असल्याचे भासवून या ठिकाणी सर्व आधुनिक सोयीनियुक्त बंगला बनविण्यात आला आहे. याठिकाणी हॅलिपॅड, स्वीमिंग
टॅँकसह अन्य सर्व सुविधा उपलब्ध आहेत.
९० वर्षाच्या आजगावकर यांनी अलिबाग येथील शाहरुखच्या मालकीच्या ‘डेजा व्हू ’फॉर्महाऊस संबंधी बनविण्यात आलेल्या कागदपत्रांची शाहरुखला कल्पना होती. त्याच्या सूचनेनुसार ती बनविण्यात आली होती. त्यामुळे शेतजमीन म्हणून भूखंड खरेदी केल्यानंतर त्याठिकाणी बांधकाम करण्यासाठी बनावट कागदपत्रे बनविली गेली.
त्यामुळे शाहरुखवर बेनामी प्रॉपट्री ट्रॅन्झेक्शन अॅक्ट (पीबीपीटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कागदोपत्री या फार्म हाऊसची किंमत १४.६७ कोटी असलीतरी प्रत्यक्षात बाजारपेठेत तो ७० कोटीच्या घरात असल्याचे सांगण्यात येते.
आजगावकर यांच्या जबाबामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे़ या प्रकरणाचा पुढील तपास होऊन अजून काही जणांचे जबाब होण्याचीही शक्यता आहे़ मात्र याने शाहरूखला झटका बसला आहे़