देशभरात उच्च रक्तदाबाचा धोका वाढतोय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 06:27 AM2018-05-17T06:27:48+5:302018-05-17T06:27:48+5:30

मेट्रो शहरात आणि अगदी गावातही तरुणांमध्ये उच्च रक्तदाबाचा धोका वाढत आहे. देशात दोन कोटींहून अधिक उच्च रक्तदाबाचे रुग्ण आहेत.

Increasing the risk of high blood pressure across the country! | देशभरात उच्च रक्तदाबाचा धोका वाढतोय!

देशभरात उच्च रक्तदाबाचा धोका वाढतोय!

Next

- स्नेहा मोरे 
मुंबई : मेट्रो शहरात आणि अगदी गावातही तरुणांमध्ये उच्च रक्तदाबाचा धोका वाढत आहे. देशात दोन कोटींहून अधिक उच्च रक्तदाबाचे रुग्ण आहेत. राज्यात ६ लाख ६१ हजार ६३, तर मुंबईत १ लाख ४१ हजार जणांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाकडून मिळाली आहे.
देशातील सरकारी रुग्णालयांमध्ये उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या २ कोटी ६२ लाख ७९ हजार ३५, तर खासगी रुग्णालयात ती ५ लाख १० हजार ९८ एवढी नोंदविण्यात आली आहे. राज्यात ती ६ लाख ५९ हजार ५८५ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, मुंबईत खासगी व सार्वजनिक रुग्णालयांत मिळून १ लाख ४१ हजार ३५९ मुंबईकरांना उच्च रक्तदाबाचे रुग्ण असल्याचे आढळून आले आहे. धावती जीवनशैली, कामाचे लांबणारे तास, तणाव, धूम्रपान, मद्यपान आणि जेवणात पौष्टिक घटकांचा अभाव आदी कारणांमुळे उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढत असल्याचे प्रामुख्याने दिसून आले आहे.
याविषयी, डॉ. अमोल पवार यांनी सांगितले की, पूर्वीच्या तुलनेत अलीकडच्या काळात उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या तरुणांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. बँकिंग, आयटी आणि प्रसार माध्यमांमध्ये काम करणाऱ्या अतितणाव असलेल्या नोकºयांमुळे झोप अनियमित असते. जेवणही वेळेवर नसते आणि जंक व पॅकेज्ड अन्नपदार्थ खाण्याचे प्रमाण अधिक असते. व्यायामाचा अभाव आणि अपुरी झोप, यामुळे अनेक जण अत्यंत तणावपूर्ण आयुष्य जगत असतात. या आधुनिकीकरणामुळे तरुणपणीच हृदयविकार जडतात. गेल्या १५ वर्षांत २५ ते ४० या वयोगटांतील उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींच्या संख्येत १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
>लक्षणे
सामान्यत: उच्च रक्तदाब असणाºया रुग्णात कुठलीच लक्षणे आढळून येत नाहीत. बहुसंख्य वेळा नित्याच्या वैद्यकीय तपासणीतच रक्तदाब वाढल्याचे दिसून येते.
इसेन्शल हायपरटेन्शन - पौगंडावस्थापूर्व मुलात क्वचित प्रसंगी अशा प्रकारचा रक्तदाब असल्याचे आढळते. ज्यांना उच्च रक्तदाब आहे, अशी बहुसंख्य पौगंडावस्थेतील मुले स्थूल असतात किंवा त्यांचे वजन त्यांच्या वयानुसार अधिक असते, तसेच उच्च रक्तदाब असणाºया टीन एजर्सच्या बºयाच आई-वडिलांमध्येही उच्च रक्तदाबाची समस्या असते.
सेकंडरी हायपरटेन्शन (दुसºया आजारामुळे वाढलेला रक्तदाब) - या गटात मोडणाºया रुग्णांनाही रक्तदाबाची अशी स्वतंत्र लक्षणे असत नाहीत. ज्या आजारामुळे त्यांचा रक्तदाब वाढला आहे, त्या आजाराची लक्षणे त्यांच्यात दिसून येतात. क्वचित प्रसंगी अभावाने, जर रक्तदाब खूपच वाढला असेल, तर मुलांत डोकेदुखी, चक्कर येणे किंवा झटके अशी लक्षणे आढळतात.
>रक्तदाब कशामुळे वाढतो ?
प्रौढांप्रमाणेच टीनएजर्समध्ये अशा प्रकारच्या उच्च रक्तदाबाचे नेमके कारण दिसून येत नाही. यासाठी आनुवंशिकता हे एक कारण असू शकते. उच्च रक्तदाबाचा त्रास जर आई-वडिलांना असेल, तर मुलांनाही तो होण्याचा धोका अधिक असतो. आनुवंशिकतेबरोबरच वाढलेले वजन, अयोग्य आहार, ताणतणाव हे घटक रक्तदाब वाढण्यास मदत करतात.
>प्रत्येकाने दर तीन महिन्यांनी रक्तदाब तपासून घेणे आवश्यक आहे. ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांनी दर आठवड्याला रक्तदाबाची तपासणी करून घेणे गरजेचे आहे. फास्ट फूडचे सेवन करण्याचे आणि मिठाचे वाढलेले प्रमाण हीसुद्धा उच्च रक्तदाब वाढण्याची प्रमुख कारणे आहेत. - डॉ. प्रदीप गाडगे, मधुमेह तज्ज्ञ.

Web Title: Increasing the risk of high blood pressure across the country!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.