मुंबई शहरात वाढतेय ट्रॅफिकची समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:07 AM2021-09-23T04:07:49+5:302021-09-23T04:07:49+5:30
मुंबई : लोकल बंद असल्या कारणामुळे सार्वजनिक व्यवस्थेवर ताण निर्माण झाला आहे. वाहकांना तसेच प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास ...
मुंबई : लोकल बंद असल्या कारणामुळे सार्वजनिक व्यवस्थेवर ताण निर्माण झाला आहे. वाहकांना तसेच प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. नागरिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सोडून येण्या-जाण्यासाठी कारचा वापर करू लागले असल्याने ट्रॅफिकचे प्रमाण वाढलेले आहे.
शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आहे. लोकल सगळ्यांसाठी सुरू नसल्याने खूप त्रास सहन करावा लागत आहे. प्रवासात किमान दोन ते तीन तास अधिकचे लागतात. रस्त्यावर जागोजागी खड्डे असल्या कारणामुळे आणखी त्रास सहन करावा लागतो. - विजय शिंदे
गाडी चालविण्यासाठी खूप कसरत करावी लागते. रस्त्यांची असणारी दूरव्यवस्था असेल किंवा ट्रॅफिक या सर्व कारणांमुळे खूप त्रास सहन करावा लागतो. सध्या पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्यामुळे समस्या निर्माण होतात. - प्रसाद कदम
सध्या लोकल बंद असल्याने वाहतूक व्यवस्थेचा ताण हा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर आला आहे. बसने प्रवास करताना येणाऱ्या अनेक समस्यांमुळे लोक आपापली कार वाहतुकीसाठी वापरू लागले आहेत. त्यामुळे साहजिकच ट्रॅफिकची समस्या उद्भवू लागली आहे. यावर उपाय म्हणून जास्तीच्या बसेस वाढवण्यात याव्यात तसेच पार्किंगची मोठी समस्या आहे. रस्त्यांच्या कडेने कार पार्क केलेल्या दिसतील तसेच या कार रस्त्याच्या जागा व्यापतात, म्हणून सरकारने पार्किंगची व्यवस्था करणे महत्त्वाचे आहे.
- अशोक दातार ( वाहतूक तज्ज्ञ )