श्रीकांत जाधव
मुंबई: राज्य जीवन प्राधिकरणात कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संघर्ष कृती समितीने मंगळवारी आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलन केले. यावेळी मोठ्या संख्येने प्राधिकरणाचे कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष अरुण निरभवणे, सरचिटणीस गजानन गटलेवार, कार्याध्यक्ष राजेंद्र शिंदे आदी प्रमुख कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली समितीने उपोषण आंदोलन केले.
प्राधिकरणात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा देण्याचा निर्णय सात वर्षांपूवी झालेला होता. मात्र अद्याप त्याची अमंलबजावनी झालेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अर्धवट सातवा वेतन आणि सेवानिवृत्ती वेतन मिळत आहे. इतर कोणतेही लाभ मिळत आहे. परिणामी सेवानिवृत्त वृद्ध कर्मचाऱ्यांना जगणे कठीण झाले आहे. समितीकडून शासनाकडे वारंवार पत्रव्यवहार केला गेला आहे. तरी सुद्धा शासन न्याय देत नसल्याने अखेर आझाद मैदानात बेमुदत उपोषण आंदोलन करण्याचा निर्णय समितेने घेतला असल्याचे अध्यक्ष निरभवणे यांनी सांगितले.