Independence Day 2021 : अरे व्वा! छोट्याशा कामातून चिमुकल्यांचा देशसेवेत हातभार; Video पाहून तुम्हीही कराल कौतुक 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 02:05 PM2021-08-15T14:05:59+5:302021-08-15T14:18:15+5:30

Independence Day 2021 And MyUdaan Trust : माय उडाण ट्रस्टने (MyUdaan Trust) शालेय विद्यार्थ्यांना देशसेवेत हातभार लावणारा एखादा उपक्रम करायला सांगितल होता. त्याला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

Independence Day 2021 ananya goenka MyUdaan Trust students contribution to country through small work | Independence Day 2021 : अरे व्वा! छोट्याशा कामातून चिमुकल्यांचा देशसेवेत हातभार; Video पाहून तुम्हीही कराल कौतुक 

Independence Day 2021 : अरे व्वा! छोट्याशा कामातून चिमुकल्यांचा देशसेवेत हातभार; Video पाहून तुम्हीही कराल कौतुक 

Next

मुंबई - देशभरात आज 75 व्या स्वातंत्र्य दिनाचा (Celebration 15th Auguest 2021) उत्साह पाहायला मिळत आहे. विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. नवी दिल्लीसह देशभर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून अनेक ठिकाणी नवनवीन उपक्रम राबवण्यात येत आहेत. माय उडाण ट्रस्टने (MyUdaan Trust) शालेय विद्यार्थ्यांना देशसेवेत हातभार लावणारा एखादा उपक्रम करायला सांगितल होता. त्याला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या चिमुकल्यांचं काम खरंच कौतुकास्पद आहे. 

माय उडाण ट्रस्टच्या सहकार्याने चालवल्या जाणाऱ्या भायखळा पश्चिमेला असलेल्या महानगरपालिकेच्या शाळेतील 4 ते 8 वर्षे वयोगटातील मुलांना देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशासाठी तुम्ही काय खास करू शकता, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर मुलांनी आपल्या कामातून अत्यंत सुंदर पद्धतीने उत्तर दिलं आहे. एका चिमुकल्याने आपल्या लहान भावाला अक्षरांची ओळख करून दिली. तर पहिलीत शिकणाऱ्या "शिक्षा" नावाच्या 7 वर्षांची मुलगी तिच्या काकीला आकडे मोजायला शिकवले. झाडे लावा, झाडे जगवा असं शाळेत शिकवलं जातं. तसेच भविष्यातही झाडं ही अत्यंत महत्त्वाची आहेत. 

चिमुकल्यांनी वृक्षारोपण केलं असून ते न चुकता आता झाडांना पाणी घालून त्यांची योग्यरित्या देखभाल करत आहेत. आपल्याला स्वच्छतेचं महत्त्व नेहमीच सांगितलं जातं. तसेच देशात स्वच्छ भारत अभियान देखील सुरू आहे. लहान मुलांनी देखील हाच आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपलं घरं आणि आजुबाजूचा परिसर स्वत: स्वच्छ केला आहे. तसेच गरजूंना मदत करा अशी शिकवणही आपल्या वागणुकीतून त्यांनी समाजाला दिली आहे. प्राणी-पक्ष्यांची काळजी घेऊन त्यांना प्रेमाने खाऊ घालणाऱ्या मुलांच्या वागणुकीचं सर्वत्र भरभरून कौतुक केलं जात आहे.

Web Title: Independence Day 2021 ananya goenka MyUdaan Trust students contribution to country through small work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.