Join us

अपक्ष उमेदवारांच्या प्रचाराचा वेग वाढला

By admin | Published: February 14, 2017 4:42 AM

निवडणुकीला अवघे आठ दिवस उरले असताना उमेदवारांची लगबग मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. राजकीय पक्षांचे उमेदवार

मुंबई : निवडणुकीला अवघे आठ दिवस उरले असताना उमेदवारांची लगबग मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. राजकीय पक्षांचे उमेदवार कार्यकर्त्यांचा लवाजमा घेऊन प्रचाराचा धडाका करत असताना अपक्ष उमेदवारही मागे नाहीत. अपक्ष उमेदवारांनीही कंबर कसली असून प्रभागांमध्ये अपक्ष उमेदवार, उमेदवारांच्या नावाने घोषणा होताना दिसत आहेत. कोणत्याही पक्षाची सत्ता येवो, मुंबईत बदल होत नाहीत. भ्रष्टाचार करणे, स्वत:ची कामे करणे यापलिकडे हे राजकीय पक्षाचे नेते जात नाहीत. या सगळ््याला आळा घालायचा असल्यास सामान्यांनी सत्तेत आले पाहिजे, म्हणूनच ‘अपक्ष’ उमेदवाराला मत द्यावा. तुमचा नगरसेवक निवडा असा प्रचार सध्या अपक्ष उमेदवार करताना दिसत आहेत. प्रभाग क्रमांक २२३, २२५, २२६ आणि २२७ मध्ये प्रत्येकी ३ अपक्ष उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. निवडणुक जवळ येत असताना अपक्ष उमेदवारही आता मतदारांच्या नजरेस पडू लागले आहेत. घरोघरी जाऊन प्रसिद्धीपत्रके वाटणे, लोकांच्या भेटी घेण्यास अपक्ष उमेदवारांनी सुरुवात केली आहे. मतदारांचे लक्ष वेधून घेण्यासाठी मोठ्या आवाजात रेकॉर्डेड मेसेज लावण्याची शक्कल अपक्ष उमेदवारांनी निवडली आहे. मोठ्या प्रमाणात मॅन पावर नसली तरीही आहे त्या लोकांमध्ये अपक्ष उमेदवार प्रचार करीत आहेत. अपक्ष कार्यकर्ते दोन-चार लोकांना घेऊन फिरताना दिसत आहेत. या उमेदवारांबरोबर एक रेकॉर्डर असतो. यामध्ये एकच रेकॉर्ड केलेला मेसेज लावलेला असतो. ज्या ठिकाणी उमेदवार प्रचारासाठी जातो तिथे हाच मेसेज वाजवण्यात येतो. अपक्ष उमेदवार सक्रिय झाल्याने आता बड्या राजकीय पक्षांचे उमेदवारांनीही जोर वाढवला आहे. काही ठिकाणी प्रत्यक्ष प्रचारासह अन्य कार्यक्रमातून छुपा प्रचार सुरु आहे. (प्रतिनिधी)