अतिक्रमण कारवाईसाठी स्वतंत्र पोलीस
By admin | Published: September 3, 2014 03:10 AM2014-09-03T03:10:04+5:302014-09-03T03:10:04+5:30
अतिक्रमण हटविताना पोलीस संरक्षण मिळत नसल्याची ओरड एकीकडे महापालिका कर्मचारी करतात, तर दुसरीकडे बंदोबस्त दिल्याचे कारण देत पोलीस हात वर करतात.
Next
अतुल कुलकर्णी - मुंबई
अतिक्रमण हटविताना पोलीस संरक्षण मिळत नसल्याची ओरड एकीकडे महापालिका कर्मचारी करतात, तर दुसरीकडे बंदोबस्त दिल्याचे कारण देत पोलीस हात वर करतात. या टोलवाटोलवीत अतिक्रमण मात्र आहे तेथेच राहते. ही कोंडी टाळण्यासाठी गृह विभागाने अक्सीर इलाज शोधून काढला आहे.
आता महानगरपालिका कार्यक्षेत्रतील अतिक्रमण निमरूलन आणि महापालिकेशी संबंधित नागरी गुन्ह्यांसाठी ठाणो, पुणो आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर स्वतंत्र नागरी पोलीस यंत्रणा आणि विशेष कक्ष कार्यान्वित करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. त्यानुसार ठाणो शहरासाठी 1क्6, पुण्यासाठी 158 आणि मीरा-भाईंदर महापालिकेसाठी 7क्, अशी एकूण 334 पदे उपलब्ध करून देण्यात आल्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
राज्याच्या नागरी भागातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमण नियंत्रण-निमरूलनासाठी ठाणो, पुणो आणि मीरा-भाईंदर महानगरपालिकेसाठी स्वतंत्र नागरी पोलीस यंत्रणा आणि संबंधित पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाशी संलग्न आर्थिक गुन्हे शाखेत विशेष कक्ष कार्यान्वित करण्यात येणार आहे. या यंत्रणा आणि विशेष कक्षासाठी गृह विभागातर्फे आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. आता ठाणो, पुणो, आणि मीरा-भाईंदर मनपासाठी 334 पदे संबंधित पोलीस आयुक्तांच्या आस्थापनेवर निर्माण केली जातील, असे पाटील म्हणाले. संबंधित पालिकांनी यापूर्वीच सर्वसाधारण सभेचा ठराव शासनाला सादर केला असून, त्यानंतरच नागरी पोलीस यंत्रणा आणि विशेष कक्षासाठी पोलीस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.
पुणो महानगरपालिका क्षेत्रत नागरी पोलीस यंत्रणोसाठी 13क् तर स्वतंत्र कक्षासाठी 28, मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रत नागरी पोलीस यंत्रणोसाठी 53, तर स्वतंत्र कक्षासाठी 17 विविध पदे निर्माण करण्यासही मान्यता दिल्याचे पाटील म्हणाले. अतिक्रमण यासारख्या नागरी गुन्ह्यांच्या संदर्भात एमआरटीपी आणि महापालिका कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करणो, त्याचा तपास करून दोषारोपपत्र दाखल करण्याची महत्त्वाची कामे स्वतंत्र कक्षाच्या माध्यमातून होणार असल्याचेही गृहमंत्र्यांनी सांगितले.
च्ठाणो महानगरपालिका क्षेत्रत नागरी पोलीस यंत्रणोसाठी
महापालिका आयुक्तांकरिता ठाणो पोलीस आयुक्तांच्या आस्थापनेवर सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि पोलीस कर्मचारी अशी 78 पदे आणि आर्थिक गुन्हे शाखेत स्वतंत्र कक्षासाठी 28 विविध पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात
आली आहे.