Join us

मुंबईतील १० रेल्वे स्थानकांवर महिलांसह ज्येष्ठ आणि दिव्यांगांसाठी स्वतंत्र तिकिट खिडकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 8:01 PM

सप्टेंबरपासून ही सुविधा सुरु करण्यात आली असून सहा महिने याची प्रायोगिक तत्वावर चाचणी होणार असून प्रवाशांचा प्रतिसाद पाहून या कायस्वरुपी ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील मुंबई विभागातील १० रेल्वे स्थानकांवर महिलासह ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांसाठी स्वतंत्र तिकिट खिडकी सुरु करण्यात आली आहे. सप्टेंबरपासून ही सुविधा सुरु करण्यात आली असून सहा महिने याची प्रायोगिक तत्वावर चाचणी होणार असून प्रवाशांचा प्रतिसाद पाहून या कायस्वरुपी ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.

मुंबई उपनगरीय लोकलवरील पश्चिम रेल्वेतून रोज ३८ लाख प्रवासी प्रवास करतात. यात रोज तिकिट काढून करणाºयांची संख्या लक्षणीय आहे. तिकिट खिडक्यांवरील एकाच रांगेत महिलांसह ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवासी देखील उभे असतात. याबाबत प्रवाशांनी पश्चिम रेल्वेकडे स्वतंत्र तिकिट खिडकी सुरु करण्याची मागणी केली होती.

पश्चिम रेल्वेवरील ११ स्थानकांवर एकूण १३ तिकिट खिडक्यां महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यंग प्रवाशांसाठी राखीव ठेवण्यात आले असून यात सूरत रेल्वे स्थानकाचा देखील समावेश असल्याचे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले. मासिक पास धारकांसाठी पश्चिम रेल्वेच्या २५ तिकिट खिडक्या राखीव ठेवण्यात आल्याची माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी दिली.  

टॅग्स :मध्य रेल्वेमुंबईतिकिट