Join us

'मुंबई विद्यापीठाचं विभाजन करून कोकण विभागासाठी स्वतंत्र विद्यापीठ' 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 7:10 PM

सामंत म्हणाले, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि दक्षिण रायगड येथील

मुंबई - मुंबई विद्यापीठाचे विभाजन करून कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करणे आवश्यक आहे. त्यासाठी एक समिती गठीत करावी असे आदेश, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले. विधानभवनात कोकण विभागासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली.

सामंत म्हणाले, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि दक्षिण रायगड येथील महाविद्यालयांकरिता स्वतंत्र विद्यापीठ स्थापन केल्यास कोकणातील विद्यार्थ्यांना होणारा त्रास कमी होईल आणि मुंबई विद्यापीठावर येणारा प्रशासकीय भार कमी होईल. त्यासाठी हे विद्यापीठ स्थापन होणे आवश्यक आहे. कोकण विभाग हा समुद्र किनारपट्टी असलेला भाग आहे. त्यासाठी स्थानिकांच्या गरजा लक्षात घेऊन समुद्र विज्ञान, नारळ संशोधन, संशोधन प्रक्रिया, उद्योग, पर्यटन, व्यापारी जहाज वाहतूक असे व्यवसायिक अभ्यासक्रम तयार करावेत. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराभिमुख शिक्षण घेता येईल.

संत विद्यापीठाच्या निर्मितीसाठी समिती गठित

महाराष्ट्राला महंत आणि वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे. राज्यात पैठण येथे संत वारकरी विद्यापीठाची निर्मिती व्हावी अशी अनेक वर्षापासूनची मागणी आहे. या विद्यापीठाच्या निर्मितीसाठी शासन सकारात्मक असून त्यासाठी एक समिती गठित करण्यात यावी. या समितीमध्ये शासकीय आणि वारकरी संप्रदायातील तज्ज्ञ मार्गदर्शक असलेल्या व्यक्तींचा समावेश असावा, असेही सामंत यांनी सांगितले. या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, संचालक धनराज माने उपस्थित होते. 

टॅग्स :उदय सामंतमुंबईमुंबई विद्यापीठ