भारतात 2019 मध्ये मालमत्ता निर्मित्ती अन् संवर्धनाला मदत - सर्वेक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 10:38 PM2019-04-25T22:38:34+5:302019-04-25T22:41:11+5:30
जागतिक बाजारपेठेतील सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 62 टक्के लोकांच्या तुलनेत भारतातील 56 टक्के लोकांनी मात्र असे मत व्यक्त केले आहे की
मुंबई - नाईट फ्रॅंकने आयोजित केलेल्या दृष्टीकोन सर्वेक्षणानुसार, चालू आर्थिक वर्षात म्हणजे 2019 या वर्षी भारतातील राजकीय व आर्थिक परिस्थितींमुळे मालमत्ता निर्मिती आणि संवर्धनाला मदत होणार आहे. याबाबत देशातील 28 टक्के भारतीयांनी आपले सकारात्मक मत व्यक्त केले. हा आकडा जागतिक रेंजच्या म्हणजेच 12 टक्क्यांच्या जवळपास दुप्पट झाला आहे. दुसरीकडे, भारतात 2019 सालच्या सुरूवातीलाच निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे संपत्ती जमा करणे कठीण जाऊ शकते, असे मत 36 टक्के लोकांनी व्यक्त केले. हा आकडा जागतिक सर्वेक्षणात बराच मोठा म्हणजे 68 टक्के आहे.
जागतिक बाजारपेठेतील सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 62 टक्के लोकांच्या तुलनेत भारतातील 56 टक्के लोकांनी मात्र असे मत व्यक्त केले आहे की, भारतात सध्या संपत्ती निर्माण करणे हितावह नाही. गेल्या वर्षी झालेल्या विकासाचा आढावा घेताना, 2018 साली संपत्ती मिळवणे व तिचे जतन करणे कठीण होते वा सोपे, याचा आढावाही या सर्वेक्षणातून घेण्यात आला. जगभरातील 70 टक्के लोकांनी सर्वेक्षणात असे म्हटले की, त्यांच्या देशातील राजकारणातील आर्थिक आणि राजकीय वातावरणामुळे 2017 च्या तुलनेत 2018 मध्ये त्यांना संपत्ती निर्माण करणे आणि तिचे संरक्षण करणे कठीण झाले. जवळ-जवळ त्याच टक्केवारीच्या लोकांनी 2019 साली याच भावना व्यक्त केल्या. नाईट फ्रँकने राजकीय आणि आर्थिक वातावरणाचा लोकांच्या संपत्ती व्यवस्थापनावर होणारा प्रभाव अभ्यासण्यासाठी सर्वेक्षण केले.
गेल्या दशकात जागतिक बँकांच्या हस्तक्षेपाची अभूतपूर्व पातळी पाहिली गेली आहे. कारण, अनेक देशांनी जागतिक आर्थिक संकटाच्या परिणामास आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. येत्या काळात, आणखी एक जागतिक मंदी उद्भवू शकते, असा अंदाज असून यूएस, यूके, युरोप आणि जपानमधील मालमत्ता खरेदी यामुळे तेजीत आहे. नाईट फ्रॅंक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष शिशीर बैजाल म्हणाले, ''निवडणुकीच्या वर्षानंतरही, भारतीय यूएचएनडब्ल्यूआय देशाच्या वाढीच्या प्रवासासाठी अधिक आशावादी आहेत आणि २०१९ मध्ये संपत्तीत वाढ होण्याची त्यांना अपेक्षा आहे. आर्थिक सुधारणांमुळे आणि संरचनेमुळे देशामध्ये बनवलेल्या मजबूत आर्थिक मुलभूत गोष्टींची ही ठोस साक्ष आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीतील प्रमुख घटकही यास कारणीभूत असून यामुळे व्यवसायातील सहजतेने निर्देशांकामध्ये सुधारणा केली जाऊ शकते. गुंतवणूकदारांनी देशासाठी सकारात्मक दृष्टिकोन बाळगला आहे. यूएस-चीन व्यापारातील तणाव, चीनची आर्थिक मंदी आणि ब्रेक्सिट यांच्यात अनिश्चिततेच्या जोडीनेच जागतिक वाढीच्या संभाव्यतेवर परिणाम घडून आला आहे. परंतु स्थानिक बाजारपेठेतील भारतीय यूएनएनव्हीआयचा दृष्टीकोन यामुळे आणखी मजबूत झाला आहे.
सर्वेक्षणातील प्रश्न – आपल्या देशातील राजकीय व आर्थिक वातावरण आणि जागतिक स्तरावर आपल्या क्लायंट्ससाठी 2019 मध्ये संपत्ती तयार करणे आणि तिचे संरक्षण करणे आपल्यासाठी सोपे किंवा अधिक कठिण ठरेल असे आपल्याला वाटते का?