Join us

India China FaceOff: कब मिलेगा करारा जबाब?; शिवसेनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 11:00 AM

तर चीनसोबतच्या संघर्ष काळात संपूर्ण देश पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आहे. पण सत्य काय आहे?

ठळक मुद्देसंघर्षाच्या काळात संपूर्ण देश पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आहेकाहीतरी बोला, देशाला सत्य जाणून घ्यायचं आहेचीनच्या कुरापतींना कधीपर्यंत सडेतोड उत्तर मिळेल?

मुंबई - भारत आणि चीन यांच्यात १९७५ नंतर पुन्हा एकदा तीव्र संघर्षाला सुरुवात झाली आहे. सोमवारी गलवान खोऱ्यात चिनी सैन्य आणि भारतीय सैन्यांच्या झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाल्याने देशात चीनविरोधात संतप्त भावना निर्माण झाली आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरुन केंद्र सरकारला आम्ही तुमच्यासोबत आहोत पण देशाला सत्य सांगा अशी मागणी केली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना याबाबत विचारणा केली आहे. पंतप्रधान शूर आणि योद्धे आहेत, तुमच्या नेतृत्वात देश चीनचा बदला घेईल, चीनच्या कुरापतींना कधीपर्यंत सडेतोड उत्तर मिळेल? कोणताही गोळीबार न होता देशाचे २० जवान शहीद झाले, आपण काय केले आहे? चीनचे किती जवान मारले? चीन भारताच्या सीमेत घुसले आहेत का? असे प्रश्न उपस्थित केले आहेत. 

तर या संघर्षाच्या काळात संपूर्ण देश पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आहे. पण सत्य काय आहे? काहीतरी बोला, देशाला सत्य जाणून घ्यायचं आहे अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन दिली आहे. दरम्यान, चीन भारत संघर्षानंतर दिल्लीतील हालचालींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्या बैठकीचा सिलसिला रात्रीपासून सुरु आहे. 

चीन आणि भारतात काय झालं आहे?सोमवारी सकाळी ब्रिगेड कमांडरसोबत स्थानिक कमांडर स्तरीय बैठक झाली. संध्याकाळी भारतीय लष्कारी अधिकाऱ्यांची टीम गलवान खोऱ्यात पीपी १४ याठिकाणी पोहचले ज्याठिकाणाहून चीनच्या सैनिकांना मागे जायचं होतं, भारतीय अधिकारी आणि त्यांच्या जवानांवर दगड आणि लोखंडाच्या रॉडने हल्ला केला. त्यामुळे भारतीय सैनिकांनीही सतर्कता बाळगत त्याला उत्तर दिलं. मोठ्या संख्येने भारताचे सैनिक त्याठिकाणी पोहचले, रात्री उशिरापर्यंत दोन्ही सैनिकात संघर्ष सुरु होता. यात घटनेत २० जवान शहीद झाले तर चीनच्या गंभीर जखमी पकडून साधारण ४३ सैनिकांचा मृत्यू झाल्याची बातमी मिळाली.   

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाभारतचीननरेंद्र मोदी