मुंबई : आजपर्यंत आम्ही सर्व गुंतवणूक चीनमध्ये केली, पण आम्हाला चीनमध्ये सुरक्षित वाटत नाही. त्यामुळे आता भारतात गुंतवणूक करायची आहे. भारतच असा देश आहे की ज्या ठिकाणी आमची गुंतवणूक सुरक्षित राहू शकू, अशा भावना जपानी उद्योजकांकडून व्यक्त करण्यात आल्याची माहिती जपान दौऱ्यावरून परतलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले, जपान आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य करतोय. जपानमध्ये विविध सरकारी अधिकारी, मंत्री, पंतप्रधानांचे सल्लागार अशा सर्व लोकांसोबत बैठका झाल्या. जायकासारख्या ओरिये एजन्सीसोबत त्याच ठिकाणी बैठक झाली. वर्सोवा ते विरार या ४२ किमीचा सीलिंक तयार करण्यासाठी जपान सहकार्य करणार आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील मेट्रो लाइन ११, छत्रपती शिवाजी टर्मिनस टू वडाळा अंडरग्राऊंड मेट्रो लाइन तयार करण्याचीही तयारी जपानने दर्शविल्याची माहिती त्यांनी दिली.
उद्योग विभागात जपानी अधिकारीजपानी कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने उद्योग विभागाची एक टीम तयार करण्यात येईल. ज्यात उद्योग विभागाचे जपानी बोलणारे मेंबर असतील, अशी माहिती फडणवीसांनी दिली.