26/11 Terror Attack: 26/11 हल्ल्यातील शहीदांना देशभरातून श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 10:38 AM2018-11-26T10:38:24+5:302018-11-26T11:08:42+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलीस यांच्यासह सर्वसामान्यांनी 26/11 हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मुंबई - मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्याला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र दहशतवादी हल्ल्याची भीती अद्याप मुंबईकरांच्या मनात कायम आहे. पाकिस्तानच्या दहा अतिरेक्यांनी 26 नोव्हेंबर 200८ रोजी रात्री समुद्रमार्गे दक्षिण मुंबईत प्रवेश केला होता. त्यांनी ताज हॉटेल, लिओपोल्ड कॅफे, नरिमन हाउस, हॉटेल ओबेरॉय, सीएसएमटी, कामा रुग्णालय या ठिकाणी अंदाधुंद गोळीबार केला होता. त्यामध्ये अधिकाऱ्यांसह शेकडो निरपराध नागरिकांचे प्राण गेले तर अनेक जण जखमी झाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वसामान्यांनी 26/11 हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच शहीद स्मारकावर मुंबई पोलिसांनी शहीदांना आदरांजली वाहिली आहे.
Tributes to those who lost their lives in the gruesome 26/11 terror attacks in Mumbai.
— Narendra Modi (@narendramodi) November 26, 2018
Our solidarity with the bereaved families.
A grateful nation bows to our brave police and security forces who valiantly fought the terrorists during the Mumbai attacks.
मुंबई दहशतवाद हल्ल्यास 10 वर्ष झाली, या हल्ल्याची झळ पोचलेल्या कुटुंब व व्यक्तींसोबत
— President of India (@rashtrapatibhvn) November 26, 2018
माझ्या संवेदना आहेत. या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस व सुरक्षा दलातील प्रत्येकास आम्ही नमन करतो. भारत देश न्याय हक्कांच्या संरक्षणासाठी व दहशतवादाच्या उच्चाटनासाठी वचनबद्ध आहे #राष्ट्रपतीकोविन्द
26/11च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईची सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 26, 2018
आज संपूर्ण मुंबई सीसीटीव्हीच्या कठोर निगराणीत आहे. दहशतवादाविरोधातील लढा आणखी तीव्र करण्याचा प्रत्येक देशवासियाचा निर्धार आहे... pic.twitter.com/UptIGhYc2E
26/11 Mumbai Attacks: मुंबईसह राज्यात कडेकोट बंदोबस्त, गर्दीच्या ठिकाणी पहारा https://t.co/p9Kgy2VrsX#MumbaiTerrorAttack#Mumbaiattack
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) November 26, 2018
Remembering those who put the nation before themselves. And our salute to the city whose resilience always made its people stronger #RememberingTheHeroespic.twitter.com/T80KfE6chr
— Mumbai Police (@MumbaiPolice) November 26, 2018
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या आणि दहशतवाद्यांशी दोन हात करून आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या सर्वांना विनम्र आदरांजली..! pic.twitter.com/qJRKY4akpT
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) November 25, 2018