ठळक मुद्देमुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्याला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. पाकिस्तानच्या दहा अतिरेक्यांनी 26 नोव्हेंबर 200८ रोजी रात्री समुद्रामार्गे दक्षिण मुंबईत प्रवेश केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलीस यांच्यासह सर्वसामान्यांनी 26/11 हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली.
मुंबई - मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्याला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र दहशतवादी हल्ल्याची भीती अद्याप मुंबईकरांच्या मनात कायम आहे. पाकिस्तानच्या दहा अतिरेक्यांनी 26 नोव्हेंबर 200८ रोजी रात्री समुद्रमार्गे दक्षिण मुंबईत प्रवेश केला होता. त्यांनी ताज हॉटेल, लिओपोल्ड कॅफे, नरिमन हाउस, हॉटेल ओबेरॉय, सीएसएमटी, कामा रुग्णालय या ठिकाणी अंदाधुंद गोळीबार केला होता. त्यामध्ये अधिकाऱ्यांसह शेकडो निरपराध नागरिकांचे प्राण गेले तर अनेक जण जखमी झाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वसामान्यांनी 26/11 हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच शहीद स्मारकावर मुंबई पोलिसांनी शहीदांना आदरांजली वाहिली आहे.