भारत-पाकिस्तान सामना : कही खुशी...कही गम...

By admin | Published: June 19, 2017 03:26 AM2017-06-19T03:26:21+5:302017-06-19T03:26:21+5:30

लोकप्रिय खेळ आणि राष्ट्रीय खेळ अनुक्रमे क्रिकेट आणि हॉकी स्पर्धेमध्ये भारत-पाकिस्तान आमनेसामने असल्याने

INDIA-PAKIST FACE: Anything ... | भारत-पाकिस्तान सामना : कही खुशी...कही गम...

भारत-पाकिस्तान सामना : कही खुशी...कही गम...

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लोकप्रिय खेळ आणि राष्ट्रीय खेळ अनुक्रमे क्रिकेट आणि हॉकी स्पर्धेमध्ये भारत-पाकिस्तान आमनेसामने असल्याने, नेटिझन्ससह क्रीडाप्रेमींसाठी रविवार हा ‘सुपर संडे’ ठरला. विशेष म्हणजे, या ‘सुपर संडे’चा विजयी श्रीगणेशा बॅडमिंटनपटू के. श्रीकांतने केला. त्यातच हॉकीत भारताने पाकवर ७-१ असा ऐतिहासिक विजय मिळवला. मात्र, क्रिकेटमध्ये पराभव झाल्यामुळे संडे सेलीब्रेशनमध्ये त्याचा प्रतिकूल इफेक्ट झाला.
भारत-पाक सामन्यासाठी शहरात जंगी तयारी करण्यात आली होती. स्पर्धेतील भारताची कामगिरी पाहता, भारत विजयश्री उंचावेल, असा विश्वास चाहत्यांना होता. मात्र, एकामागोमाग फलंदाज बाद होत राहिल्याने, चाहत्यांमध्ये निराशा पसरली. शहरांतील काही अंशी हॉटेल मालकांनी भारत-पाक सामन्याच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सूट दिली. मात्र, प्रत्यक्षात सामना हरल्याने हॉटेल मालकांसह ग्राहकांमध्येदेखील नाराजी पसरली असल्याने, ‘मौका गवाया’ अशी भावना होती.
दरम्यान, सुपर संडेची धमाकेदार सुरुवात देशाचा आघाडीचा बॅडमिंटनपटू के. श्रीकांतने केली. इंडोनेशिया सुपर सीरिज प्रीमियर स्पर्धेमध्ये श्रीकांतने ऐतिहासिक विजयाची नोंद केली. त्या वेळी क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण होते. त्यानंतर, हरमनप्रीत आणि तलविंदर सिंग हॉकी वर्ल्ड लीगच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाने पाकिस्तानचा ७-१ ने धुव्वा उडवला. मात्र, भारताच्या फलंदाजांच्या हाराकिरीमुळे त्या आंनदावर विरजण पडले. विजयाने सुरू झालेल्या सुपर संडेचा शेवट क्रिकेटच्या पराभवाने झाला.
 

Web Title: INDIA-PAKIST FACE: Anything ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.