पॅरिस - काश्मीरमधून कलम ३७० हटविल्यानंतर पाकिस्ताननेभारताविरोधात खोटा प्रचार करण्यास सुरुवात केली मात्र त्याला यश आलं नाही. प्रत्येकवेळी भारताकडूनपाकिस्तानला चोख उत्तर देण्यात आलं. पाकिस्तानने यावेळी संयुक्त राष्ट्र संघाच्या यूनेस्कोमध्ये काश्मीरशिवाय अयोध्या निकालाचा मुद्दाही उचचला. यावर भारताने यूनेस्को कॉन्फरन्समध्ये पाकिस्ताची पोलखोल करत त्यांच्या डीएनएमध्ये दहशतवाद आहे.
भारताच्या प्रतिनिधीने पाकिस्तानच्या खोट्या दाव्याला उत्तर देताना सांगितले की, पाक भारताची अखंडता आणि अंतर्गत प्रकरणात दखल देण्याचा प्रयत्न करतोय. मात्र स्वत:च्या देशात मानवाधिकाराची पायमल्ली करत आहे.
यावेळी पाकिस्तानने काश्मीरसोबत सुप्रीम कोर्टाने अयोध्या प्रकरणावर दिलेल्या निकालावर भाष्य केलं. भारतानेही जशास तसं उत्तर देत आमच्या शेजारील राष्ट्राला दुसऱ्याच्या घरात बघण्याची सवय लागली आहे. स्वत:च्या घरातील कारनामे लपविण्यासाठी भारताच्या अंतर्गत प्रकरणावर खोटे दावे करत आहे. मात्र त्यांच्या देशात दहशतवाद्यांनी पोखरलं आहे. अल्पसंख्याकांवर अत्याचार सुरु आहेत. भारताच्या प्रतिनिधीने पाकिस्तानच्या कारनाम्याची यादीच वाचून दाखविली.
भारताच्या प्रतिनिधी अनन्या अग्रवाल यांनी सांगितले की, १९४७ मध्ये पाकिस्तानात २३ टक्के अल्पसंख्याक समाज होता. ती संख्या घटून आता ३ टक्क्यांवर आली आहे. त्याठिकाणी शीख, हिंदू, अहमदिया मुस्लिम यांच्याविरोधात कायदे बनवून त्यांना बळजबरीने धर्मांतर करण्यास भाग पाडलं जात आहे.
त्याचसोबत पाकिस्तानमध्ये महिलांवर हिंसाचार, बालविवाह आणि ऑनर किलिंग ही मोठी समस्या आहे. हा असा देश आहे ज्यांचे नेते यूएनच्या व्यासपीठावरुन अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देते. पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ ओसामा बिन लादेन आणि अन्य दहशतवाद्यांना पाकिस्तानचे हिरो मानतात. पाकिस्तान हे अपयशी राष्ट्र आहे ज्यात दहशतवाद्यांनी पायं रोवले आहेत. यूनेस्कोचा वापर राजकीय आणि अपप्रचार करण्यासाठी करण्यावर भारताने कडक शब्दात निषेध केला आहे.
अयोध्या प्रकरण भारताचा अंतर्गत मामलाकाही दिवसापूर्वीच सुप्रीम कोर्टाने अयोध्या प्रकरणावर ऐतिहासिक निर्णय दिला. यूनेस्कोमध्ये अयोध्या प्रकरणावर पाकिस्तानने भाष्य केलं. त्यावर भारताने हा मामला आमच्या राष्ट्रातील अंतर्गत आहे. यात हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार तुम्हाला नाही अशा शब्दात पाकिस्तानला बजावलं आहे.