Join us

सबमें राम...शाश्वत श्रीराम! ५१०० पोस्टकार्ड सजवून मध्य रेल्वेचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 10:58 AM

मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर ५ हजार १०० पोस्टकार्ड सजवत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला.

मुंबई : मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर ५ हजार १०० पोस्टकार्ड सजवत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला. पोस्ट कार्डचा वापर करत ‘सबमे राम...शाश्वत श्री राम’ हे वाक्य तयार करण्यात आले.

भारताने ५ हजार १०० पोस्टकार्डसह तयार केलेल्या वाक्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झाला असून, भारताने चीनला मागे टाकले आहे. चीनने १ हजार ३५२ पोस्टकार्डचा वापर करून एक वाक्य तयार केले होते. मागील विक्रम शांघायमधील फ्रिसलँड कॅम्पिना (चीन)कडे होता. त्यांनी दि. २२ सप्टेंबर २०२१ रोजी १,३५२ पोस्टकार्ड वापरून एक वाक्य तयार केले होते. २० सहभागींसह ते पूर्ण करण्यासाठी १६ तास लागले होते. 

सीएसएमटी येथे ५२ स्वयंसेवकांनी ९ तास ३० मिनिटांत ५ हजार १०० पोस्टकार्डचा वापर करून ‘सबमें राम...शाश्वत श्री राम’ हे वाक्य तयार केले.

मागील विक्रम शांघायमधील फ्रिसलँड कॅम्पिना (चीन) कडे होता. २२ सप्टेंबर २०२१ रोजी १,३५२ पोस्टकार्ड वापरून एक वाक्य तयार केले होते आणि २० सहभागींसह ते पूर्ण करण्यासाठी १६ तास लागले होते. हा रेकॉर्ड तयार करणारा कार्यक्रम भारतीय संस्कृती, कला आणि साहित्यासाठी मोठ्या उत्सवांच्या मालिकेचा एक भाग आहे. या आठवड्यात मुंबईत एका भव्य आणि सर्वसमावेशक उत्सवाचा समारोप झाला. 

भारतीय रेल्वे आणि इतर संस्थांद्वारे समर्थित तीन दिवसीय महोत्सवात भारत आणि विदेशातील नामवंत साहित्यिक व्यक्ती, कलाकार आणि मान्यवरांच्या सहभागासह साहित्यिक परिसंवाद, दृश्य कला आणि परफॉर्मिंग आर्ट्स सादर होतील. हे पर्व भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याचा आणि समकालीन संदर्भात भावी पिढ्यांसमोर सादर करण्याचा अनोखा प्रयत्न दर्शवतो याबद्दल भारतीय रेल्वेला त्याचा एक भाग असल्याचा अभिमान आहे, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

टॅग्स :मुंबईभारतगिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्य रेल्वेछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस