लोकलमध्ये टोळक्याची दादागिरी; ज्येष्ठ पत्रकारावर जीवघेणा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 11:37 AM2018-02-21T11:37:57+5:302018-02-21T11:38:51+5:30
लोकलमध्ये टोळक्याने चढणा-या प्रवाशांनी शुक्ला यांना चढण्यास विरोध केला होता. पण अखेर प्रयत्न करून शुक्ला गाडीत चढले, आणि नंतर...
मुंबई : मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार सुधीर शुक्ला यांच्यावर 15 ते 20 जणांनी जीवघेणा हल्ला केल्याचं वृत्त आहे. ते इंडिया टीव्हीमध्ये कार्यरत आहेत. मीरारोड ते अंधेरी असा लोकल प्रवास करताना 15 ते 20 जणांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि गंभीर जखमी केल्याची माहिती आहे. विले-पार्ले येथील कुपर रूग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आलं आहे. लोकलमध्ये टोळक्याने चढणा-या प्रवाशांचा त्यांनी विरोध केला होता असं वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मीरारोड ते अंधेरी असा लोकल प्रवास करताना लोकलमध्ये टोळक्याने चढणा-या प्रवाशांनी शुक्ला यांना चढण्यास विरोध केला होता. पण अखेर प्रयत्न करून शुक्ला गाडीत चढले, आणि नंतर त्या टोळक्यासोबत त्यांची बाचाबाची झाली. त्यानंतर टोळक्याने शुक्ला यांना मारहाण कऱण्यास सुरूवात केली. अंधेरीच्या जीआरपी पोलीस स्थानकात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई क्राइम रिपोर्टर्स असोसिएशने या घटनेची निषेध नोंदवला असून कठोर कारवाई कऱण्याची मागणी केली आहे.