२०२० पर्यंत भारत ऑटो एक्स्पोर्ट हब होणार

By admin | Published: November 26, 2014 01:40 AM2014-11-26T01:40:51+5:302014-11-26T01:40:51+5:30

२०२० पर्यंत जागतिक स्तरावर भारत ऑटो अँक्सिलिअरी हब म्हणून उदयास येईल असे भाकीत करण्यात आले.

India will become auto expo hub till 2020 | २०२० पर्यंत भारत ऑटो एक्स्पोर्ट हब होणार

२०२० पर्यंत भारत ऑटो एक्स्पोर्ट हब होणार

Next
एडलवाइजच्या संशोधन अहवालात भाकीत
ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. २५ - भारतीय कंपन्या आता ख-या अर्थाने जागतिक बनल्या असून भारतीय ऑटो कम्पोन्टट कंपन्यांचे आंतरराष्ट्रीय उत्पन्न ५१ टक्क्यापर्यंत गेले आहे, अशी माहिती देतानाच २०२० पर्यंत जागतिक स्तरावर भारत ऑटो अँक्सिलिअरी हब म्हणून उदयास येईल असे भाकीत  करण्यात आले. 
देशातील आघाडीची कंपनी असणाऱ्या एडलवाइज फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडने मंगळवारी ऑटो कम्पोनण्टसः द फ्युचरः मेगा ट्रेण्डस, मेगा फॅक्टर्स हा विषयनिष्ठ संशोधन अहवाल प्रकाशित करण्यात आला यामध्ये हे भाकीत वर्तविण्यात आले आहे. 
या अहवालात देशभरातल्या  आघाडीच्या ३० हून अधिक ऑटो कम्पोनण्ट उत्पादकांचा समावेश करण्यात आला. भारतीय ऑटो कम्पोनण्ट कंपन्यांचे आंतरराष्ट्रीय उत्पन्न एकूण उत्पन्नात ५१ टक्के योगदान देतात जे २००२ मध्ये केवळ १२ टक्के होते. काही कंपन्याचे आंतरराष्ट्रीय उत्पन्न २००२ मध्ये एकूण विक्रीतून आलेल्या उत्पन्नाच्या केवळ १० टक्के इतके होते, जे आता ५० टक्क्यांहून अधिक बनले आहे. भारतीय कंपन्या आता खऱ्या अर्थाने जागतिक बनल्या आहेत. 
सध्या भारतीय ऑटो कम्पोनण्ट क्षेत्रातल्या ट्रेण्डसमध्ये मोठ्या प्रमाणावर परिवर्तन घडून येत आहे. ३८०० कोटी अमेरिकन डॉलर एवढी आर्थिक उलाढाल असणाऱ्या आणि एफवाय २१ई (एसीएमए) पर्यंत १७ टक्के सीएजीआरने ११,५०० कोटी अमेरिकन डॉलरपर्यंत वाढण्याची क्षमता असणारे ऑटो कम्पोनण्ट क्षेत्र सध्या एकूण उद्योगक्षेत्रात १७ टक्के (७०० कोटी अमेरिकन डॉलर) एवढे योगदान देत आहे. कुशल मनुष्यबळाची उपलब्धता आणि तांत्रिक क्षमता या गुणांच्या बळावर आता बरेचसे भारतीय उद्योग केवळ कम्पोनण्ट पुरवठादार म्हणून न राहत सिस्टिम किंवा मॉड्युल पुरवठादार म्हणून काम करू लागले आहेत, अशी माहिती एडलवाइज रिटेल रिसर्च विभागाचे असोसिएट डायरेक्टर आणि प्रमुख श्री. विनय खट्टर यांनी दिली. 

 

Web Title: India will become auto expo hub till 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.