डिसेंबर अखेर दाऊद येणार भारतात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 02:46 AM2018-04-01T02:46:13+5:302018-04-01T02:52:29+5:30
कुख्यात मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम डिसेंबर अखेर भारतात येणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणाकड़ून मिळाली आहे. खरे तर या आधीही दाऊदने भारतात परतण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, यंदा काही अटी आणि शर्तींवर तो भरतात परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबई : कुख्यात मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम डिसेंबर अखेर भारतात येणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणाकड़ून मिळाली आहे. खरे तर या आधीही दाऊदने भारतात परतण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, यंदा काही अटी आणि शर्तींवर तो भरतात परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गेल्या २५ वर्षांपासून भारतीय तपास यंत्रणा दाऊदच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न करत आहे. मार्च १९९३ रोजी मुंबईतील १३ जागी बॉम्बस्फोट करण्यामागे दाऊदचा हात होता. त्यानंतर, त्याला या गुन्ह्यांत मोस्ट वॉंटेंंड आरोपी घोषित करत लूकआउट नोटीस बजावली. २०१३ मध्ये अमेरिकेने ग्लोबल टेररिस्ट म्हणूनही त्याला घोषित केले आहे. इंटरपोलसुद्धा दाऊदच्या शोधात आहेत. २०११ साली फोर्ब्सने जगातील सर्वात खतरनाक गुन्हेगारांच्या यादीत दाऊदचा समावेश केला होता.
रत्नागिरी जिल्ह्यात जन्मलेल्या दाऊदचे वडील मुंबई पोलिसात कॉन्स्टेबल होते. मात्र, लहानपणासूनच गुन्हेगारी विश्वाशी जोडला गेलेला दाऊद, अंडरवर्ल्ड जगताचा बेताज बादशाह बनला. कराचीतल्या पॉश अशा क्लिफ्टनमधील आलिशान बंगल्यात दाऊद सध्या वास्तव्यास आहे. त्याला आयएसआयचे अभेद्य सुरक्षा कवच आहे. मात्र, वार्धक्याकडे झुकलेला आणि अनेक आजारांनी त्रस्त अशा दाऊदची त्याचा राइट हँड आणि गेल्या ३० वर्षांपासून त्याच्यासोबत इमान राखणाऱ्या शकीलने साथ सोडली आहे. दुसरीकडे दाऊदचा सर्वांत लाडका मुलगा असलेल्या मोईन कासकरने मौलवी बनण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दाऊद सध्या नैराश्येत बुडाल्याची माहिती समोर आली.
त्यात १९९३च्या बॉम्ब स्फोट मालिकेतील मास्टर माइंड आणि दाऊदचा साथीदार फारुख टकला याला नुकतीच दुबईतून अटक केली. त्यात दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरही ठाणे पोलिसांच्या ताब्यात आहे. टकलाच्या अटकेमुळे दाऊदपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याला अटक करण्यासाठी धडपड सुरू असून, डिसेंबर अखेरपर्यंत त्याला भारतात आणण्यात येणार आहे.
वाचकहो, थोडा धक्का बसला ना, बातमी वाचून. नेहमीच ‘सिरिअसली’ बातम्या वाचणाऱ्या वाचकांना हा गोड धक्का देण्याचा छोटासा प्रयत्न. निमित्त अर्थातच आजच्या ‘एप्रिल फूल’ चे. डोण्ड टेक इट सिरिअसली...