Indian Air Strike on Pakistan: सैतान अझर मसूदला मारल्याशिवाय बदला पूर्ण होणार नाही - संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 11:41 AM2019-02-26T11:41:47+5:302019-02-26T11:44:05+5:30
'हाऊ इज द जैश... डेड सर' असा आनंद नेटिझन्सकडून व्यक्त होतोय.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ला करून, जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर बॉम्बवर्षाव करून भारतीय वायुसनेनं आज पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारतीय लष्कराच्या या धडाकेबाज कारवाईचं सर्वच स्तरांतून कौतुक होतंय. 'हाऊ इज द जैश... डेड सर' असा आनंद नेटिझन्सकडून व्यक्त होतोय. या कामगिरीबद्दल वायुसेनेचं अभिनंदन करतानाच, जैशच्या सैतानाला - अझर मसूदला मारल्याशिवाय बदला पूर्ण होणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.
हिंदुस्तानच्या फायटर विमानांनी पाकव्याप्त काशमीर वर हल्ला केला. वायू सेनेचे अभिनंदन. जैश ए मोहम्मद चा सैतान अजहर मसुद ला मारल्या शिवाय बदला पुर्ण होणार नाही.
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 26, 2019
१४ फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरमधील पुलवामा इथं 'जैश-ए-मोहम्मद'नं सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. त्यात ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा बदला घेण्याची, सर्जिकल स्ट्राइक-२ करण्याची तीव्र भावना देशभरातून व्यक्त होत होती. ही इच्छा आज वायुसेनेनं पूर्ण केली आहे. 'मिराज 2000' या हायटेक लढाऊ विमानांमधून भारतानं १००० किलोचे बॉम्ब 'जैश'च्या तळांवर पाडले. त्यात ३०० दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचं समजतं.
IAF Sources: At 0330 hours on 26th February a group of Mirage 2000 Indian Fighter jets struck a major terrorist camp across the LoC
— ANI (@ANI) February 26, 2019
and completely destroyed it. pic.twitter.com/RlxTJ4e3AF
IAF Sources: 12 Mirage 2000 jets took part in the operation that dropped 1000 Kg bombs on terror camps across LOC, completely destroying it pic.twitter.com/BP3kIrboku
— ANI (@ANI) February 26, 2019
भारतीय वायुसेनेच्या या कारवाईचा पुरावा पाकिस्ताननेच दिला आहे. अर्थात, आमच्या विमानांनी भारतीय वायुसेनेची विमानं परतवून लावली, असा फुसका दावा पाकिस्तानचं लष्कर करतंय. परंतु, त्यात काही तथ्य नाही. उलट, भारतीय वायुसेनेची ताकद पाहून पाकिस्तानचं F16 मागे फिरलं, अशी माहिती समोर येत आहे.
Sources: Pakistani F16s were scrambled to retaliate against IAF Mirage 2000s but turned back due to size of Indian formation. Western Air Command coordinated operation. pic.twitter.com/cCXndYNc1H
— ANI (@ANI) February 26, 2019
Sources: One of the targets destroyed by IAF Mirage jets was in Pakistan’s Khyber Pakhtunkhwa area pic.twitter.com/QJtWeTxOfk
— ANI (@ANI) February 26, 2019
दरम्यान, या कारवाईनंतर केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झाली.
Delhi: Meeting of Cabinet Committee on Security underway at 7, LKM pic.twitter.com/sCq0MZSB2u
— ANI (@ANI) February 26, 2019