इंडियन एअरलाइन्सच्या विमानाच्या अपहरणाची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 05:48 AM2019-02-24T05:48:47+5:302019-02-24T05:48:57+5:30

हाय अ‍ॅलर्ट । सर्व विमानतळांच्या सुरक्षेत वाढ

Indian Airlines plane hijack threat | इंडियन एअरलाइन्सच्या विमानाच्या अपहरणाची धमकी

इंडियन एअरलाइन्सच्या विमानाच्या अपहरणाची धमकी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण करण्याची धमकी आल्यानंतर, देशातील सर्वच विमानतळांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. हाय अ‍ॅलर्टच्या सूचना देत, सुरक्षा यंत्रणांना कठोर पावले उचलण्यास सांगितले आहे.


धमकीचा हा फोन नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसीतील कॉलसेंटरमध्ये शुक्रवारी आला होता. फोनवर बोलणारी व्यक्ती इंग्रजीतून बोलत होती. त्या व्यक्तीने आपण एअर इंडियाचे विमान हायजॅक करणार असल्याचे धमकावत फोन कट केला. रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी दिली.


दरम्यान, देशातील सर्वच विमानतळांवर येणाऱ्यांची कसून तपासणी होत आहे. विमानतळ, आॅपरेशनल विभाग, इतर महत्त्वाच्या इमारतींमध्ये येणाºयांवर लक्ष ठेवावे, वाहनांमध्ये बॉम्ब ठेवून स्फोट घडविण्याची शक्यता असल्याने, त्यांची तपासणी करावी, बेवारस वाहन उभे राहणार नाही, याची काळजी घ्यावी, कार्गो, विमानात दिल्या जाणाºया खाद्यपदार्थांच्या विभागात सशस्त्र सुरक्षा वाढवावी, अशा सूचना दिल्या आहेत.

ताबडतोब माहिती द्या
कोणतीही संशयास्पद वस्तू, घटना नजरेला पडल्यास तत्काळ नियंत्रण कक्षाला माहिती देऊन, त्यावर कारवाई करावी आदी निर्देश एअरपोर्ट सिक्युरिटी ग्रुप (एएसजी) व एव्हिएशन सिक्युरिटी ग्रुप या सीआयएसएफचा भाग असलेल्या विभागांना बीसीएएसने दिले आहेत.

Web Title: Indian Airlines plane hijack threat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.