Join us

LMOTY 2023: मोठी जबाबदारी पेलली, कंपनीचा वटवृक्ष केला; लोकमत पुरस्कार सोहळ्यात कुमार मंगलम बिर्लांसह 'बिझनेस पे चर्चा'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 6:38 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध क्षेत्रांमधील दिग्गजांच्या उपस्थितीत होणार मुलाखत.

कुमार मंगलम बिर्ला हे भारतातील दिग्गज व्यवसायिकांपैकी एक आहेत. आदित्य बिर्ला समूहाचे ते अध्यक्ष आहेत. १९९५ मध्ये वडिलांच्या निधनानंतर कुमार मंगलम बिर्ला यांनी बिर्ला समूहाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. वयाच्या केवळ २८ व्या वर्षी त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आली. त्यांनी आपलं व्यवसाय कौशल्य आणि मेहनतीच्या जोरावर आपल्या समूहाचा विस्तार केला. त्यांना पद्मभूषण पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलंय. असे कुमार मंगलम बिर्ला 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार' सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

महाराष्ट्रातील सर्वात मोठा पुरस्कार सोहळा असा नावलौकिक मिळवलेल्या, 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कारां'चा भव्य सोहळा २६ एप्रिल २०२३ रोजी वरळीतील एनएससीआय डोममध्ये रंगणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध क्षेत्रांमधील दिग्गज या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात लोकमत मीडियाचे सहव्यवस्थापकीय आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा हे दिग्गज उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांची मुलाखत घेणार आहेत. बिर्लांचा आजपर्यंतचा प्रवास, उद्योग जगतातील आव्हानं अशा कोणत्या प्रश्नांना ते कशी उत्तरं देणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

याच सोहळ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची महामुलाखत होणार आहे. अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह बँकर ते सिंगर असा यशस्वी प्रवास करणाऱ्या अमृता फडणवीस राज यांना प्रश्न विचारणार आहेत. तसंच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले घेणार आहेत.

टॅग्स :लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2023व्यवसायकुमार मंगलम बिर्ला