बनावट रहिवासी परमिट बाळगल्याप्रकरणी भारतीय नागरिकाला एक वर्षाचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:07 AM2021-02-12T04:07:34+5:302021-02-12T04:07:34+5:30

देशाच्या प्रतिमेला तडा देणारी बाब बनावट रहिवासी परमिट बाळगल्याने भारतीय नागरिकाला एक वर्षाचा कारावास लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ...

Indian national jailed for one year for holding fake resident permit | बनावट रहिवासी परमिट बाळगल्याप्रकरणी भारतीय नागरिकाला एक वर्षाचा कारावास

बनावट रहिवासी परमिट बाळगल्याप्रकरणी भारतीय नागरिकाला एक वर्षाचा कारावास

Next

देशाच्या प्रतिमेला तडा देणारी बाब

बनावट रहिवासी परमिट बाळगल्याने भारतीय नागरिकाला एक वर्षाचा कारावास

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बनावट ब्रिटिश रहिवासी परमिट बाळगल्याप्रकरणी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आलेल्या एक व्यक्तीला अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा ठोठावली. अशा प्रकारांमुळे देशाची प्रतिमा मलिन होते आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी समस्या निर्माण होते, असे न्यायालयाने म्हटले.

अतिरिक्त मुख्य दंडाधिकारी आर. आर. खान यांनी ८ फेब्रुवारी रोजी हार्दिक पटेल गुजरातचा रहिवासी असून, भारतीय दंड संहिता कलम ४७१ (बनावट कागदपत्रे खरी असल्याप्रमाणे वापरणे) व ४२० (फसवणूक) केल्याप्रकरणी दोषी असल्याचे म्हटले.

विशेष बाब म्हणजे, आरोपीने भारत व ब्रिटनच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांना फसविले. हे अत्यंत गंभीर आहे. अशा प्रकारांमुळे नोकरी इछुक तरुणांना व विद्यार्थ्यांना व्हिसा मिळत नाही आणि देशाच्या प्रतिमेलाही तडा जातो, असे निरीक्षण दंडाधिकाऱ्यांनी नोंदविले.

सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, २०१० मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील इमिग्रेशन अधिकाऱ्याने पटेल याचा पासपोर्ट तपासला. अधिकाऱ्याला पटेल यांच्या ब्रिटन रहिवासी परमिटबाबत शंका निर्माण झाली. त्याने याबाबत अधिक चौकशी केली असता त्याला समजले की, पटेल २००७ मध्ये विद्यार्थ्यांसाठी असलेल्या व्हिसावर ब्रिटनला गेला. त्यावर त्याला २० तास काम करण्याची परवानगी होती. २००८ मध्ये त्याच्या व्हिसाची मुदत संपली. त्यानंतर त्याने २००८ मध्ये ब्रिटन रहिवासी परमिट घेतले. त्याची मुदत डिसेंबर २००९ मध्ये संपली. अधिक काम करायला मिळावे, यासाठी त्याने २००८ ते २०१२ पर्यंत मुदत असलेला आणखी एक ब्रिटन रहिवासी परमिट घेतले.

याबाबत ब्रिटिश दूतावासाला संपर्क साधला असता त्यांनी आरोपीने २००८ ते २०१२ या मुदतीतले ब्रिटन रहिवासी परमिट बनावट असल्याचे सांगितले, अशी माहिती तपासअधिकाऱ्यांनी न्यायालयाला दिली. धक्कादायक म्हणजे आरोपी उच्चशिक्षित आहे. त्याने कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता एका खासगी व्यक्तीला पैसे देऊन परमिट घेतले. हा गुन्हा त्याने ब्रिटनमध्ये राहून पैसे कमावण्याच्या नादात केला असावा, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

--------------------

Web Title: Indian national jailed for one year for holding fake resident permit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.